शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 22:25 IST

पुण्यात आगीच्या घटनेत १५ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Pune Fire: पुण्यात एका १४  मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत एका १५ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर आग आटोक्यात आणणाऱ्या दोन जवानांसह पाच जण जखमी झाले. पुण्यातील उंड्री येथील जगदंबा भवन रोडवरील मार्वल आयडियल स्पेसिओ सोसायटीच्या १२ व्या मजल्यावर शुक्रवारी दुपारी आग लागली. या घटनेमुळे रहिवाशांमध्ये घबराट पसरली होती. घटनेची माहिती मिळताच  अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी पाठवण्यात आल्या. अग्निशमन दलाने बऱ्याच प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र तोपर्यंत एका मुलाचा मृत्यू झाला होता.

१२ व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये दुपारी भीषण आग लागल्यानंतर इमारतीमध्ये एकच खळबळ उडाली होती.  या घटनेत बेडरुममध्येच होरपळून एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला तर दोन अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांसह पाच जण जखमी झाले. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी पाच अग्निशमन गाड्या आणि एक हायड्रॉलिक शिडी घटनास्थळी पाठवली होती. आग विझवत असतानाच फ्लॅटमधील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला, ज्यामुळे दोन अग्निशमन दलाचे जवान आणि तीन रहिवासी जखमी झाले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी काय सांगितले?

"१२ व्या मजल्यावरील घरातील स्वयंपाकघरातून आग सुरू झाली. त्यानंतर, दोन सिलिंडरचे स्फोट झाले, ज्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना इमारतीत प्रवेश करण्यास अडथळा निर्माण झाला. शेजारीही आत अडकलेल्या लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करत होते. संपूर्ण फ्लॅटमध्ये फर्निचर होते, ज्यामुळे आगीची तीव्रता खूप जास्त होती. आग संपूर्ण फ्लॅटमध्ये पसरली होती. आम्हाला बेडरूममध्ये सुमारे १५ वर्षांचा एक मुलगा मृतावस्थेत आढळला. आम्ही शक्य तितक्या लवकर आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. आगीच्या तीव्र उष्णतेमुळे कोणालाही वाचवणे अत्यंत कठीण होते. स्वयंपाकघर फ्लॅटच्या प्रवेशद्वाराजवळ होते आणि आम्ही फ्लॅटमध्ये प्रवेश करताच दुसऱ्या सिलिंडरचा स्फोट झाला," अशी माहिती अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Fire: Boy Dies, Firefighters Injured in Cylinder Blast

Web Summary : A 15-year-old boy died in a Pune flat fire after a cylinder exploded as firefighters entered. Five others, including two firefighters, were injured. The fire started in the kitchen and quickly spread due to furniture, hindering rescue efforts.
टॅग्स :Puneपुणेfireआग