शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

लिफ्टमध्ये अडकलेल्या नागरिकांची अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 18:35 IST

लिफ्टमध्ये तासभर अडकलेल्या नागरिकांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप सुटका केली.

पुणे : अचानाक लिफ्ट बंद पडल्याने अडकून पडलेल्या रुग्ण महिला व चार पुरुषांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप बाहेर काढले. दुपारी बाराच्या सुमारास सातारा रस्त्यावरील आदिनाथ शाॅपिंग माॅलमधील लिफ्ट अचानक बंद पडली. त्यात नागरिक अडकून पडले. अग्निशमन दलाला याबाबतची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी  दाखल हाेऊन नागरिकांची सुटका करण्यात आली. 

आदिनाथ शाॅपिंग माॅलच्या लिफ्टमध्ये एक रुग्ण महिला व चार पुरुष तासभर अडकून पडले हाेते. लिफ्टमन देखील नागरिकांसाेबत हाेता. तासभरानंतर बाहेर पडण्याचे अथक प्रयत्न केल्यानंतरही सुटका न झाल्याने लिफ्टमध्ये अडकलेल्या एका व्यक्तीने अग्निशमन दलाला फाेन करत सुटकेची मागणी केली. अग्निशमन मुख्यालयातील जवान घटनास्थळी लगेचच पोहोचले. लिफ्ट दुसऱ्या मजल्यावर मधोमध अडकली हाेती. यामधे एक रुग्ण महिला याच ठिकाणी एक्स-रे काढण्यासाठी आली होती. ते पाच ही जण घाबरलेले होते. जवानांनी त्यांना धीर देत लिफ्ट रुममधे प्रवेश करुन प्रयत्न केले व अवघ्या दहा मिनिटातच सर्व पाच जणांना सुखरुप बाहेर काढले. जवानांनी कर्तव्य बजावत केलेल्या कामाचे त्या पाच ही जणांनी आभार मानले.

या कामगिरीमधे प्र.अ. प्रदिप खेडेकर, वाहन चालक राजू शेलार, जवान छगन मोरे, शफिक सय्यद, मंगेश मिळवणे, रऊफ शेख, राजेश घडशी, विठ्ठल साबळे, दिक्षित, मेनसे, रणपिसे, तारु यांनी सहभाग घेतला.

टॅग्स :fire brigade puneपुणे अग्निशामक दलPuneपुणेAccidentअपघात