गुडलक चौकातील इलेक्ट्रॉनिक दुकानाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 15:56 IST2018-03-20T15:56:26+5:302018-03-20T15:56:26+5:30

गुडकल चौकातील व्हिडिओकॉन डीटूएच शोरुमला डीटूएच शोरुमच्या दुसऱ्या मजल्यावर मंगळवारी आग लागली़.

Fire in electronic shop at goodluck Chowk |  गुडलक चौकातील इलेक्ट्रॉनिक दुकानाला आग

 गुडलक चौकातील इलेक्ट्रॉनिक दुकानाला आग

ठळक मुद्देशॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज

पुणे : डेक्कन जिमखाना येथील गुडलक चौकातील व्हिडिओकॉन डीटूएच शोरुमच्या दुसऱ्या मजल्यावर भीषण आग लागून त्यात सर्व फर्निचर जळून खाक झाले़ शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशामक दलाने व्यक्त केला़. 
अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुडकल चौकातील व्हिडिओकॉन डीटूएच शोरुमला डीटूएच शोरुमच्या दुसऱ्या मजल्यावर मंगळवारी आग लागली़. याची खबर अग्निशामन दलाला सकाळी ७ वाजता मिळाली़. अग्निशामन दलाच्या ३ गाड्या तातडीने घटनास्थळी पोहचल्या़. दुसऱ्या मजल्यावरील आतील बाजू संपूर्ण आगीने वेढली गेली होती़ . अग्निशमन दलाच्या जवानाने अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळविले़ . मात्र, तोपर्यंत दुसरा मजला संपूर्ण जळून खाक झाला होता़. तेथील फर्निचर, कॉम्युचर, खुर्च्या, टेबल जळून खाक झाले़. अग्निशामक दलाचे अधिकारी गजानन पाथ्रुडकर, जवान कोंडिबा झोरे, किशोर बने, संजय पाटील, संजय गायकवाड, समीर शेख, गणेश लोणारे, एकनाथ कुंभार, सागर शिर्के, भूषण ओव्हाळ, कुणाल वाघोले, अभ्यंकर, वाहनचालक शेखर येरफुल यांच्या मदतीने आग विझविण्यात आली़.शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे़ .

Web Title: Fire in electronic shop at goodluck Chowk