हातवीज दुर्गावाडी येथे जनावरांच्या गोठ्याला आग, ८ जनावरे मृत्यूमुखी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 14:48 IST2018-03-05T14:48:29+5:302018-03-05T14:48:29+5:30

जुन्नर तालुक्याच्या दुर्गम आदिवासी भागातील हातवीज दुर्गावाडी येथे जनावरांच्या गोठ्याला आग लागली. त्यात ८ जनावरे मृत्यूमुखी पडले. या घटनेत काही जनावरे जखमी झाले, तर काही जनावरे दोर तोडून पळाल्याने  वाचली आहे .

A fire in a cattle moth at Hastavis Durgavadi, 8 animals killed |   हातवीज दुर्गावाडी येथे जनावरांच्या गोठ्याला आग, ८ जनावरे मृत्यूमुखी 

  हातवीज दुर्गावाडी येथे जनावरांच्या गोठ्याला आग, ८ जनावरे मृत्यूमुखी 

ठळक मुद्दे सुमारे ४लाख रुपयांचे नुकसान या आगीत झाल्याची माहिती पारधी यांनी दिली.

 जुन्नर: जुन्नर तालुक्याच्या दुर्गम आदिवासी भागातील हातवीज दुर्गावाडी  येथे जनावरांच्या गोठ्याला आग लागली. त्यात ८ जनावरे मृत्यूमुखी पडले. जुन्नर तालुक्याच्या हातवीज येथील हरिभाऊ पुनाजी पारधी यांच्या शेतातील गोठ्यास आग लागली, मात्र, आगीचे कारण समजू शकले नाही. या घटनेत काही जनावरे जखमी झाले, तर काही जनावरे दोर तोडून पळाल्याने  वाचली आहे . घटनेच्या दिवशी पारधी रात्री जेवण करुन घरी बसले असताना शेतात आरडाओरड सुरु असल्याने ते शेतात गेले.गावातील ग्रामस्थ नामदेव कसाळे,रघुनाथ पारधी, पोलिसपाटील अनंता पारधी यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत संपूर्ण गोठा जळून खाक झाला होता. सुमारे ४लाख रुपयांचे नुकसान या आगीत झाल्याची माहिती पारधी यांनी दिली. सरपंच भागाबाई पारधी यांनी व पोलीस कर्मचारी खंडागळे यांनी पंचनामा केला आहे.

Web Title: A fire in a cattle moth at Hastavis Durgavadi, 8 animals killed