शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

पुण्यात सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटाजवळील कंपनीला भीषण आग; एकाचा मृत्यू, आणखी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 13:19 IST

अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू

ठळक मुद्देआगीच्या धुराचे लोट लांबवर पसरल्याने परिसरात बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी

धायरी : पुणे शहरातील सिंहगड रस्ता परिसरातील नांदेड फाटा येथील भाऊ इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये एका कंपनीला भीषण आग लागल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 

गुरूवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली असून या कंपनीत वाढदिवसाचे डेकोरेशन व पार्टी पॉप फटाके बनविण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. कंपनीत असणाऱ्या काही केमिकलमुळे याठिकाणी सिलेंडर स्फोटासारखे आवाज होत आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पुणे व पीएमआरडीए अग्नीशमन दलाचे ८ बंब घटनास्थळी दाखल झाले असुन आग विझवण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर हवेली पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी देखील घटनास्थळी पोहचले आहेत. कंपनीच्या बाहेर बघ्यांनी देखील मोठया प्रमाणावर गर्दी केली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. अग्नीशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आगीच्या धुराचे लोट लांबवर पसरल्याने परिसरात बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.  

त्यामुळे अग्निशमन दलाच्या वाहनांना रस्ता मिळण्यास अडचण निर्माण येत होती. हवेली पोलिसांनी बघ्यांना बाजूला करीत अग्निशमन दलाच्या वाहनांना रस्ता करून दिला. या कारखान्याला लागून अनेक कारखाने असल्याने आग पसरल्यास आणखी मोठा धोका निर्माण होऊ शकतो. आगीत एकाचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर काही जण आतमध्ये अडकले असल्याने मृतांचा आकडा  वाढण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :PuneपुणेfireआगFire Brigadeअग्निशमन दलPoliceपोलिस