कुरकुंभ येथील रासायनिक कंपनीला भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 11:04 PM2019-08-14T23:04:36+5:302019-08-14T23:04:50+5:30

कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील अल्कली अमाईन्स या रासायनिक कंपनीला बुधवारी रात्री भीषण आग लागली.

The fire broke out at a chemical company in Kurkumbh | कुरकुंभ येथील रासायनिक कंपनीला भीषण आग

कुरकुंभ येथील रासायनिक कंपनीला भीषण आग

googlenewsNext

कुरकुंभ - कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील अल्कली अमाईन्स या रासायनिक कंपनीला बुधवारी रात्री भीषण आग लागली. पुणे-सोलापूर महामार्गापासून ही कंपनी अगदी जवळ असल्याने पोलिसांनी महामार्ग बंद केला आहे. येथे कामगार होते किंवा नाही याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.
अल्कली अमाईन्स कंपनीत मोठ्या प्रमाणावर रसायनांचा साठा होता. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्याला आग लागली. रसायनांचे बॅरल असल्याने स्फोट होऊ लागले. त्यामुळे आगीचे मोठमोठे लोळ उठत होते. सुमारे पाच ते सहा किलोमीटर अंतरावरून आगीचे लोळ दिसत होते. त्यामुळे पोलिसांनी परिसराची पूर्ण नाकेबंदी केली होती. स्फोट होत असल्याने अग्निशमन बम्बना आगीपर्यंत पोहोचणे अवघड होतं होते. आगीची तीव्रता मोठी असल्याने पोलिसांनी आणि ग्रामस्थांनी पाटसजवळ पुणे-सोलापूर महामार्ग बंद केला होता. सुमारे एक किलोमीटरपर्यंत आगीचे लोळ येत असल्याने कंपनीत कामगार होते किंवा नाही याबाबत पोलिसांनाही माहिती नव्हती. दरम्यान, भीतीने गाव सोडून ग्रामस्थ पळ काढत आहेत.

Web Title: The fire broke out at a chemical company in Kurkumbh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे