कोथरुड येथे धुरात अडकलेल्या ज्येष्ठ महिलेची अग्निशमन दलाकडून सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 16:55 IST2018-04-30T16:55:02+5:302018-04-30T16:55:02+5:30

तळमजल्यावरील विद्युत मंडळाच्या मीटरने अचानक पेट घेतल्याने कोथरुडच्या रामबाग कॉलनीतल्या तारांगण सोसायटीत सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आग लागली.

Fire brigade Rescued women from fire at kothrud | कोथरुड येथे धुरात अडकलेल्या ज्येष्ठ महिलेची अग्निशमन दलाकडून सुटका

कोथरुड येथे धुरात अडकलेल्या ज्येष्ठ महिलेची अग्निशमन दलाकडून सुटका

ठळक मुद्देजवानांनी इमारतीत राहणाऱ्या सुमारे १५-२० रहिवाशांना सुखरुप बाहेर काढले.

पुणे : तळमजल्यावरील विद्युत मंडळाच्या मीटरने अचानक पेट घेतल्याने कोथरुडच्या रामबाग कॉलनीतल्या तारांगण सोसायटीत सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीच्या तीव्रतेमुळे पूर्ण इमारतीत धुराचे लोट पसरले होते. त्यात सोसायटीतील नागरिक अडकले होते. त्यात एक ज्येष्ठ महिलेचा समावेश होता. अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षास ही माहिती मिळाल्यावर काही क्षणातच घटनास्थळी दाखल झाले. त्यात महिलेची सुटका केली. 
या घटनेची माहिती एरंडवणा अग्निशमन दलाला मिळाल्यावर घटनास्थळी वाहनासह धाव घेतली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचताच काही जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु केला तर दुसरीकडे इतर जवानांनी इमारतीत राहणाऱ्या सुमारे १५-२० रहिवाशांना सुखरुप बाहेर काढण्यास सुरवात केली. त्याचवेळी जवानांना एक ज्येष्ठ महिला मंगला आगरकर (वय ८४) यांना धुरामुळे त्रास होत असून त्या दुसऱ्या मजल्यावर असल्याचे समजले. त्याचवेळी तत्परतेने जवान किशोर बने यांनी आगरकर यांना इतर जवानांच्या साह्याने उचलून खाली आणले. खाली आल्यानंतर आगरकर यांनी सुटकेचा आनंद मानत अग्निशमन दलाच्या जवानांचे आभार मानले. त्याचवेळी विद्युत मंडळाचे कर्मचारीसुध्दा  तारांगण सोसायटीत दाखल झाले. आग विझल्याची नोंद घेऊन धोका नसल्याची खात्री करत अग्निशमन दलाचे जवानांनी घटनास्थळ सोडले.
सदर कामगिरीमधे एरंडवणा अग्निशमन केंद्राचे जवान ज्ञानेश्वर खेडेकर, किशोर बने, कोंडिबा झोरे, प्रविण रणदिवे तर  देवदूत क्विक रिस्पॉन्स टिमचे हेमंत कांबळे, शुभम गोल्हार, राकेश नाईकनवरे यांनी सहभाग घेतला.

Web Title: Fire brigade Rescued women from fire at kothrud