अखेर चिमुरड्या विराटचा मृतदेह सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 16:05 IST2018-06-29T16:02:28+5:302018-06-29T16:05:50+5:30
सायकल खेळत असताना उतारावरुन सायकल घसरल्याने थेट नदीत गेलेल्या पाच वर्षाच्या चिमुरड्याचा तिसऱ्या दिवशी लागला असून आज सकाळी कल्याणीनगरच्या पुलाजवळ त्याचा मृतदेह शोधण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. विराट प्रसाद काची (वय ५) असे या मुलाचे नाव आहे.

अखेर चिमुरड्या विराटचा मृतदेह सापडला
पुणे : सायकल खेळत असताना उतारावरुन सायकल घसरल्याने थेट नदीत गेलेल्या पाच वर्षाच्या चिमुरड्याचा तिसऱ्या दिवशी लागला असून आज सकाळी कल्याणीनगरच्या पुलाजवळ त्याचा मृतदेह शोधण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. विराट प्रसाद काची (वय ५) असे या मुलाचे नाव आहे.
बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास विराट खेळत असताना त्याची सायकल उतारावरुन घसरुन थेट नदीत गेली. यात विराटही नदीत बुडाला.विराट नदीपात्रात बुडाल्याची माहिती त्याचा चूलतभाऊ सूरज याने घरी जाऊन सांगितली. ही घटना सीअाेईपीच्या मागील बाजूस बाेट क्लब जवळ घडली. तेव्हापासून अग्निशामक दलाच्या जवानांकडून त्याचा शाेध घेणे सुरु होते. बुधवारी रात्री उशीरापर्यंत त्याचा शाेध लागू शकला नाही. त्यानंतर गुरुवारी पुन्हा सकाळपासून येरवडा अाणि भवानी पेठ अग्निशामक दलाचे 10 जवान विराटचा शाेध घेत हाेते. त्यांनी नागरिकांच्या मदतीने तसेच नावेच्या साहाय्यानेही प्रयत्न केले होते. परंतु त्यांच्या हाती निराशाच अाली होती. अखेर शुक्रवारी सकाळी ११च्या सुमारास त्याचा मृतदेह मिळाला आहे.