शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

फायर ऑडिटचा केवळ फार्स : बस आग प्रकरण  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 19:01 IST

देखभाल-दुरूस्तीच्या अभावामुळे बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे...

ठळक मुद्देमहामंडळाकडे ८१९ डिझेल व ५६३ सीएनजी अशा एकुण १३८२ स्वमालकीच्या बस बस फायर ऑडिटसाठी पीएमपी प्रशासनाने काही दिवसांपुर्वी स्वतंत्र समिती नेमली

पुणे : बसला सातत्याने आगी लागत असल्या तरी अद्याप पुणे महानगर परिवहन महामंडळाला नेमके कारण शोधता आलेले नाही. देखभाल-दुरूस्तीच्या अभावामुळे बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मागील अनेक महिन्यांपासून केवळ बस फायर ऑडीट खेळ खेळला जात आहे. पीएमपी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, महामंडळाकडे ८१९ डिझेल व ५६३ सीएनजी अशा एकुण १३८२ स्वमालकीच्या बस आहेत. तर भाडेतत्वावरील ६५३ बस सीएनजीवरील आहेत. वर्ष २०१७-१८ मध्ये आतापर्यंत १३ बसला आग लागली आहे. त्यामुळे पीएमपीच्या मालकीच्या बससह भाडेतत्वावरील बसही आहेत. दर महिन्याला एक याप्रमाणे बस जळून खाक होत आहेत. या घटना रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातात. पण हे उपाय तात्कालीक ठरत आहेत. सर्व बसमध्ये अग्निशमन यंत्र बसविण्याची घोषणा करण्यात आली होती. पण अद्याप शेकडो बसमध्ये ही यंत्र नाहीत. आग लागल्यानंतर अद्याप एकाही चालक किंवा वाहनाने या यंत्राचा वापर केलेला नाही. काही महिन्यांपुर्वी बसचे फायर ऑडीट करण्याची घोषणाही आगीच्या धुरात विरून गेली. केंद्रीय रस्ते वाहतुक संस्थे (सीआयआरटी) वर ही जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे अधिकाºयांनी सांगितले होते. पण त्याचे पुढे काहीच झाले नाही. एका खासगी संस्थेकडून हे ऑडीट करून घेण्याचेही नियोजन होते. पण अशी कोणतीही संस्था नसल्याचे समोर आले. एका संस्थेला दिलेले कामही अधिक खचार्मुळे मागे घेण्यात आले. त्यानंतर आॅटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन फ इंडिया (एआरएआय) या संस्थेकडून ऑडीट केले जाणार होते. पण तेही मागे पडले. आता प्रशासनाने स्वतंत्र समिती स्थापन केली आहे. ही समिती तरी आगडोंब विझविणार का? हे येत्या काही दिवसांत समजेल. पण आतापर्यंत लागलेल्या आगींचे नेमके कारण समजले नसले तरी या आगी देखभाल-दुरूस्तीच्या अभावामुळेच लागत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बसला आग लागण्यापुर्वी पुढील बाजूने धुर येतो. त्यानंतर लगेचच आग लागून संपुर्ण बस पेटते. चालकांच्या प्रसंगावधानामुळे या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण त्यामुळे या घटनांचे महत्व कमी होत नाही. बसची योग्यप्रकारे देखभाल नसल्यास केवळ आगच नाही तर कशाही प्रकारे अपघात होण्याची शक्यता आहे. जुन्या बसचे पीएमपीचे कारणही चुकीचे ठरत आहे. चार-पाच वर्षांपुर्वीच्या बसही पेटल्या आहेत.------------------------बस आग प्रकरण : पीएमपीला सापडेना नेमके कारण बस फायर ऑडिटसाठी पीएमपी प्रशासनाने काही दिवसांपुर्वी स्वतंत्र समिती नेमली आहे. या समितीमध्ये एआरएआ, सीआयआरटी, आरटीओचे प्रत्येकी एक अधिकारी, टाटा मोटर्स, अशोक लेलंड, महालक्ष्मी ऑटोमोटिव्ह, अँथनी गॅरेजचा प्रत्येकी एक प्रतिनिधी, फायर ऑडीट कन्स्लटंट, पीएमपीचे दोन मुख्य अभियंता, भांडार अधिकारी व देखभाल अभियंता यांचा समावेश आहे. महामंडळाकडील डिझेल व सीएनजी बसचे दरमहा तांत्रिक परीक्षण करण्याची जबाबदारी समितीवर सोपविण्यात आली आहे. दरमहिन्याच्या पहिल्या आठवड्यात समितीटी बैठक होईल. त्यामध्ये बस फायर ऑडीट करून अहवाल सादर केला जाईल. समितीची २२ जानेवारी रोजी बैठक झाली असून त्यामध्ये उपाययोजनांचा आढावा तयार करण्यात आला असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली. ......भाडेतत्वावरील बसकडे दुर्लक्षपीएमपी प्रशासनाने नुकतीच स्थापन केलेली समिती केवळ स्वमालकीच्या बसचेच ऑडीट करणार आहे. पण भाडेतत्वावरील बसबाबत मात्र निर्णय घेण्यात आलेला नाही. बुधवारी आग लागलेली बस भाडेतत्वावरील होती. या बसेसच्या देखभाल-दुरूस्तीवर पीएमपीचे कोणतेही नियंत्रण नाही. त्यामुळे ब्रेकडाऊनचे प्रमाणही अधिक आहे. तरीही प्रशासन या बसकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. ठेकेदारांना सातत्याने पत्रव्यवहार करून सक्त ताकीद दिल्याचा दावा अधिकारी करतात. पण त्यानंतरही स्थिती सुधारताना दिसत नाही. 

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलfire brigade puneपुणे अग्निशामक दलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका