शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षांवर गुन्हा ; पैशांचा अपहार केल्याचा आराेप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 4:50 PM

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षांवर पैशाचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखाना व शरद ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेचे अध्यक्ष रंजनकुमार शंकरराव तावरे यांनी पतसंस्थेचे सचिव नंदकुमार कृष्णाजी खैरे यांच्या संगनमताने ५१ लाख ३० हजार रुपयांचा आर्थिक अपहार केल्याचा गुन्हा बारामती तालुका पोलिसांनी दाखल केला आहे.याप्रकरणी बारामती पोलिस ठाण्यात माळेगाव कारखान्याचे संचालक व पतसंस्थेचे सभासद सुरेश तुकाराम खलाटे यांनी रंजनकुमार तावरे व पतसंस्थेचे सचिव नंदकुमार कृष्णांजी खैरे यांच्याविरुद्ध शनिवारी (१८) रोजी उशिरा पोलिसात फिर्याद दिली. 

दिलेल्या फिर्यादीनुसार २०११ मध्ये शरद ग्रामीण बिगरशेती  पतसंस्थेचे अध्यक्ष व सचिव नंदकुमार कृष्णाजी खैरे यांनी संगनमत करून माझ्यासह रामदास आटोळे (खांडज), राजेंद्र तुकाराम बुरुंगले (माळेगाव बुद्रुक) आम्हा तिघांच्या कर्जमागणी प्रकरणी कोऱ्या धनादेशावर सह्या घेतल्या. त्यानुसार आमच्या नावे प्रत्येकी १७ लाख १० हजार रुपये असे एकूण ५१ लाख ३० हजार रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याचे दाखवले. तसेच सदर रक्कम रोखड (बेअरर) चेक द्वारे आमच्या परस्पर काढून घेतली, असल्याचे सुरेश तुकाराम खलाटे यांनी फियार्दीत नमूद केली आहे. त्यामुळे पोलिसांनी फियार्दीनुसार व सहाय्यक निबंधक चौकशी अहवालाच्या आधारे पोलिसांनी शरद ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेचे अध्यक्ष रंजनकुमार शंकरराव तावरे व सचिव नंदकुमार कृष्णाजी खैरे विरुद्ध फसवणूक करणे, बनावट कागदपत्र तयार करणे, रकमेचा अपहार करणे, विश्वास घात करणे आणि महाराष्ट्र गुंतवणूकदार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Puneपुणेfraudधोकेबाजी