शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत छोट्या सदनिकांचा दंड पूर्ण माफ

By admin | Updated: March 28, 2017 02:33 IST

शहरामध्ये महापालिकेकडून परवानगी न घेता केलेल्या बांधकामांना प्रतिवर्षी मालमत्ता कराच्या दुप्पट कर शास्ती

पुणे : शहरामध्ये महापालिकेकडून परवानगी न घेता केलेल्या बांधकामांना प्रतिवर्षी मालमत्ता कराच्या दुप्पट कर शास्ती (दंड) म्हणून भरावा लागत होता. राज्य शासनाने ६०० चौरस फुटापर्यंतच्या अनधिकृत निवासी बांधकामांचा हा प्रतिवर्षी भरावा लागणारा दंड पूर्णपणे माफ केला आहे. ६०१ ते १००० चौरस फुटापर्यंतच्या निवासी बांधकामांना मालमत्ता कराच्या ५० टक्के दराने तर १००१ चौरस फुटावरील बांधकामांना दुप्पट दराने प्रतिवर्षी हा दंड आकारला जाणार आहे. या निर्णयाची येत्या १ एप्रिलपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.मुंबई महानगरपालिका अधिनियम १९८८, व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमांतर्गत अनधिकृत बांधकामांना मालमत्ता कराच्या दुप्पट दराने शास्ती आकारण्याची तरतुद होती. त्यामध्ये दुरूस्ती करण्यात आल्याचे आदेश शासनाकडून काढण्यात आल्या आहेत. पुणे महापालिकेमध्ये येत्या १ एप्रिल २०१७ पासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली.बांधकाम व्यावसायिकांकडून अनधिकृत बांधकाम झाल्यानंतर त्यातील सदनिका गरजू खरेदीदारांना विकण्यात येत होत्या. अनेकदा नागरिकांकडून त्या अधिकृत असल्याचया गैरसमजातून त्या खरेदी केल्या जायच्या. अनधिकृत बांधकामांच्या नियमानुसार दंडाच्या रकमेची आकारणी ही खरेदीदार नागरिकांकडून वसूल केली जायची. त्यामुळे छोटे सदनिकाधारक यामध्ये नाहक भरडले जात असल्याने त्यांचा दंड माफ करण्यात आल्याचे शासनाच्या आदेशामध्ये स्पष्ट केले. शास्ती कराची आकारणी ही प्रत्येक महापालिकांमध्ये वेगवेगळया पध्दतीने केली जात होती. सर्व महापालिकांना दंडाच्या आकारणीची एकच नियमावली ठरवून देण्यात आल्याचे  मुक्ता टिळक यांनी सांगितले. (प्रतिनिधी)मिळकत कराच्या उत्पन्नावर परिणामपुणे शहरामध्ये शास्ती लावण्यात आलेल्या सदनिकांची एकूण संख्या ही १८ हजार इतकी आहे. त्यातील छोटया सदनिकांना दरवर्षी आकारण्यात येणारा शास्ती कर माफ करण्यात आल्यामुळे महापालिकेच्या मिळकत कराच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. मिळकत कराचे उत्पन्न वाढविण्यासाठी महापालिकेकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना यामुळे मोठा धक्का बसला आहे.अनधिकृत बांधकामांना अभयराज्य शासनाकडून अनधिकृत छोटया सदनिकांकडून प्रतिवर्षी आकारण्यात आलेला दंड माफ करण्याचा निर्णय घेतल्याने अनधिकृत बांधकामांना अभय मिळून त्यामध्ये वाढ होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. शासनाच्या या निर्णयामुळे शहरात आणखी मोठयाप्रमाणात अनधिकृत बांधकामे फोफावण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.