शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

‘वोटर हेल्पलाईन अ‍ॅप’ वरही समजणार निकाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 2:06 PM

अनेकांच्या मनात मतमोजणी बद्दलची आणि विविध पक्षांच्या उमेदवारांना मिळणा-या मतांबाबतची उत्कंठा वाढत चालली आहे.

ठळक मुद्देपुणे,बारामती,शिरूर व मावळ या चारही लोकसभा मतदार संघाची मतमोजणी येत्या २३ मे  ‘वोटर हेल्पलाईन’ हे निवडणूक आयोगाचे अधिकृत मोबाईल अ‍ॅप आहे.मतमोजणी कक्षाच्या बाहेरील परिसरात व आतील बाजूस कडेकोट पोलीस बंदोबस्त असणार

पुणे: लोकसभा निवडणूकीची मतमोजणी सुरू होण्यास आता काही तास उरलेले आहेत. त्यामुळे अनेकांच्या मनात मतमोजणी बद्दलची आणि विविध पक्षांच्या उमेदवारांना मिळणा-या मतांबाबतची उत्कंठा वाढत चालली आहे. मात्र, मतमोजणी कक्षात उपस्थित न राहता सुध्दा उमेदवारांना प्रत्येक फेरीत मिळणा-या मतांची माहिती ‘वोटर हेल्पलाईन’ या मोबाईल अ‍ॅपवर समजू शकणार आहे. त्यामुळे केवळ विविध वृत्त वाहिन्यांवर दाखविल्या जाणा-या मतमोजणीच्या आकडेवारीवरच अवलंबून राहावे लागणार नाही.पुणे जिल्ह्यातील पुणे,बारामती,शिरूर व मावळ या चारही लोकसभा मतदार संघाची मतमोजणी येत्या २३ मे रोजी होणार आहे. जिल्हा प्रशासनाने त्यासाठी आवश्यक असलेली सर्व  तयारी पूर्ण केली आहे. मतमोजणी कक्षाच्या बाहेरील परिसरात व आतील बाजूस कडेकोट पोलीस बंदोबस्त असणार आहे.त्यातही प्रशासनाकडून पास देण्यात आलेल्या व्यक्तींनाच मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार आहे.परिणामी कोणत्या उमेदवाराला कोणत्या फेरीत किती मते मिळाली याबाबतची माहिती मतदान कक्षातील व्यक्तींना तात्काळ समजणार असली तरी त्याचवेळी निवडणूक आयोगाला सहायक निवडणूक अधिका-यांकडून मतमोजणीची आकडेवारी ऑनलाईन पध्दतीने कळविली जाणार आहे.त्यामुळे निवडणूक अधिका-याने ऑनलाईन भरलेली माहिती ‘वोटर हेल्पलाईन’ या मोबाईल अ‍ॅपवरही दिसणार आहे. ‘वोटर हेल्पलाईन’ हे निवडणूक आयोगाचे अधिकृत मोबाईल अ‍ॅप आहे. त्यामुळे निकालाची अधिकृत आकडेवारी प्रत्येकाला आपल्या मोबाईलवर पहाता येणार आहे.सर्व सामान्य नागरिकांना सुध्दा आपल्या मोबाईलवर मतमोजणीची आकडेवारी समजू शकेल ,असे उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह यांनी सांगितले.------------------------------------------------- लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीच्या फे-यांची आकडेवारी केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे ‘वोटर हेल्पलाईन’ या मोबाईल अ‍ॅपवर प्रसिध्द केली जाणार आहे. त्यामुळे आपल्या मोबाईलमध्ये ‘वोटर हेल्पलाईन’ हे मोबाईल अ‍ॅप डाऊन लोड करून घेणा-यांना मतमोजणीच्या फे-यांमध्ये मोजल्या जाणा-या मतांची आकडेवारी समजू शकेल.- नवल किशोर राम, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी ,पुणे 

टॅग्स :PuneपुणेElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगNavalkishor Ramनवलकिशोर रामLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल