मंचर येथील खासगी कोविड रुग्णालयात आर्थिक लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:17 IST2021-05-05T04:17:02+5:302021-05-05T04:17:02+5:30
खासगी कोविड रुग्णालयाचे डॉक्टर रुग्णांकडून दररोजचे रूम व बेड चार्जेस पाच हजार रुपये, डॉक्टर तपासणी फी एक हजार पाचशे ...

मंचर येथील खासगी कोविड रुग्णालयात आर्थिक लूट
खासगी कोविड रुग्णालयाचे डॉक्टर रुग्णांकडून दररोजचे रूम व बेड चार्जेस पाच हजार रुपये, डॉक्टर तपासणी फी एक हजार पाचशे रुपये, गरज नसताना कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिविर इंजेक्शन आणायला लावणे अशा प्रमाणात रुग्णांची लूट करत आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांनी याबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे खासगी कोविड सेंटरच्या अनेक तक्रारी केल्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांचे १० ते १५ हजार रुपयांपर्यंत बिले कमी केली आहेत. तसेच खासगी कोविड रुग्णालयामध्ये मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक व डॉक्टरांमध्ये शाब्दिक वाद होत होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. कोविड रुग्णांची आर्थिक लूट करणाऱ्या खासगी कोविड सेंटर चालकांवर कारवाई करावी व दोषी आढळणाऱ्या सेंटरचा परवाना रद्द करावा, अशी मागणी कोरोना रुग्ण व त्यांचे नातेवाईक करत आहेत. त्याचप्रमाणे खासगी कोविड सेंटरचे शासकीय ऑडीि करावे, अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून होत आहे.
आंबेगाव तालुक्यातील खासगी कोविड रुग्णालयात मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत असल्याचे गटविकास अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर वाढीव दिलेली बिले व नंतर कमी केलेली बिले.