पुण्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या गाडीचा ताफा अडवला; पोलिसांकडून आंदोलक ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 16:24 IST2022-09-22T16:15:40+5:302022-09-22T16:24:53+5:30
आपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले...

पुण्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या गाडीचा ताफा अडवला; पोलिसांकडून आंदोलक ताब्यात
पुणे : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण सध्या पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. भाजपच्या मिशन लोकसभा या कार्यक्रमांतर्गत त्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती विजयासाठी भाजपाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. दौऱ्यावर असताना सीतारामण यांचा ताफा पुणे शहरातील वारजे येथे आपच्या कार्यकर्त्यांकडून अडवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्काळ आपच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन अर्थमंत्री सीतारामण यांचा ताफा पुढे जाऊ दिला.
महागाई, जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी, जनविरोधी आर्थिक धोरणे याचा निषेध करत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या गाडीचा ताफा अडवला, अशी माहिती आप पक्षाकडून देण्यात आली.
यात आपचे वारजे माळवाडी भागातील कार्यकर्ते निलेश वांजळे यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते. यावेळी महागाई विरोधात, केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांविरोधात व ऑपरेशन लोटस विरोधात घोषणा देण्यात आल्या. यानंतर आपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.