शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

... अखेर पुन्हा १० मे पासून भामा आसखेड पाईपलाईनचे काम सुरु होणार : सौरभ राव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 19:37 IST

पुणे शहराच्या या पूर्व भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी भामा आसखेड धरणावरुन बंद पाईप लाईनद्वारे पाणी आणण्याची योजना हाती घेण्यात आली.

ठळक मुद्दे प्रकल्पग्रस्तांसाठी ५ कोटींचा निधी जिल्हाधिका-यांच्या खात्यात जमापोलीस आयुक्तांनी दर्शवली आवश्यक असलेला संपूर्ण पोलीस बंदोस्त देण्याची तयारी

पुणे: भामा आसखेड प्रकल्पग्रस्त शेतक-यांनी शासनाने जाहीर केलेला हेक्टरी १५ लाख रुपयांचा मोबदला घेण्यास नकार देत मार्च मध्ये बंद पाडलेले पाईपलाईनचे काम आता पुन्हा एकदा येत्या १० मे पासून सुरु होणार आहे. यासाठी आवश्यक असलेला संपूर्ण पोलीस बंदोस्त देण्याची तयारी पोलीस आयुक्तांनी दर्शवली आहे. तसेच पहिल्या टप्प्यात प्रकल्पग्रस्त शेतक-यांना देण्यात येणा-या मोबदल्यासाठीचे सुमारे ५ कोटी रुपये बुधवारी (दि.८) रोजी जिल्हाधिका-यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली.      येरवडा, चंदननगर, संगमवाडी, धानोरी, कळस, लोहगाव, वडगावशेरी पुणे शहराच्या या पूर्व भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी भामा आसखेड धरणावरुन बंद पाईप लाईनद्वारे पाणी आणण्याची योजना हाती घेण्यात आली. यासाठी सन २०१३ मध्ये शासनाने योजनेला मंजुरी दिली. परंतु प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित असल्याने गेल्या पाच वर्षांत योजनेचे काम पूर्ण होऊ शकले नाही. याबाबत प्रकल्पग्रस्तांना वेळोवेळी विविध आश्वासने देण्यात आली. त्यामुळे आता पर्यंत ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. परंतु बांधित प्रकल्पग्रस्तांसह परिसरातील शेतक-यांनी तीव्र आंदोलन करून यापुढे एक इंच देखील काम होऊ देणार नाही, असा पवित्रा घेत योजनेचे काम बंद पाडले. त्यानंतर मार्च २०१९ च्या पहिल्या आठवड्यात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाब बैठक घेतली. यामध्ये जिल्हाधिकारी नवलकिशोर राम व पुर्नवसन अधिकारी भारत वाघमारे यांनी तायर केलेल्या बांधित प्रकल्पग्रस्ताच्या पुर्नवसनाच्या प्रस्तावाला मंजुरी देत भामा आसखेडमधील सर्व बांधित शेतक-यांना प्रत्येकी १५ लाख रुपये हेक्टरी रोख मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला.     त्यानुसार जिल्हा पुर्नवनस अधिकारी वाघमारे यांनी शेतक-यांना मदत वाटप करण्यास सुरुवात देखील केली. दरम्यान जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहिर झाली. या कालावधीत काही बांधित शेतक-यांनी एकत्र येऊन आम्हाला जमिनीच्या बदल्यात जमिन देण्याची मागणी करत रोख स्वरुपात मोबदला घेण्यास विरोध केला. त्यामुळे शेतक-यांनी पुन्हा योजनेचे काम बंद पाडले. यामुळे गेल्या दीड महिन्यांपासून योजनेचे काम बंद आहे. निवडणूक आयोगाने दुष्काळ आणि पाणी पुरवठ्याच्या योजनांसाठी आचारसंहिता शिथिल केल्याने बुधवारी (दि.८) रोजी सौरभ राव यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पुर्नवसन अधिकारी,  पोलिस अधिकारी यांच्या सोबत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. यामध्ये येत्या १० मे पासून कडक पोलिस बंदोबस्तामध्ये योजनेचे काम सुरुकरण्याचा निर्णय घेण्यात आला. 

टॅग्स :PuneपुणेDamधरणSaurabh Raoसौरभ रावPoliceपोलिस