शहरं
Join us  
Trending Stories
1
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
2
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
3
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
4
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाची पहिली महिला पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
5
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
6
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
7
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
8
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
9
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
10
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
11
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
12
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
13
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
14
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
15
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
16
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
17
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
18
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
19
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
20
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ‘पार्किंग बे’वरील अपघातग्रस्त विमान हटविले! पुणे विमानतळावरील विमानांचा विलंब टळणार

By अजित घस्ते | Updated: June 27, 2024 17:23 IST

पुणे विमानतळाच्या ‘बे’वर एअर इंडियाचे अपघातग्रस्त विमान जागेवर उभे असल्याने त्याचा ताण इतर विमानांच्या प्रवासी वाहतुकीवर झाला होता...

पुणे : गेल्या दीड महिन्यापासून पुणे विमानतळाच्या ‘पार्किंग बे’वर उभ्या असणाऱ्या एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाला संरक्षण दलाच्या जागेत हलवण्यात आले आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतल्यानंतर अवघ्या २४ तासांत हे विमान संरक्षण खात्याच्या जागेत ‘पार्क’ करण्याची परवानगी दिली. या विमानाला हलविल्यामुळे पुणे विमानतळावरील ये-जा करणाऱ्या विमानांचा विलंब टळणार आहे.

पुणे विमानतळाच्या ‘बे’वर एअर इंडियाचे अपघातग्रस्त विमान जागेवर उभे असल्याने त्याचा ताण इतर विमानांच्या प्रवासी वाहतुकीवर झाला होता. शिवाय ही बे वापरात नसल्यामुळे विमानांचे वेळापत्रक कोलमडत होते. या विमान दुरुस्तीसाठी आणखी काही काळ लागण्याची शक्यता असल्याने विमान तात्पुरत्या स्वरुपात संरक्षण दलाच्या जागेवर हलविण्याचा पर्याय उपलब्ध होता. या पार्श्वभूमीवर अपघातग्रस्त विमान संरक्षण दलाच्या जागेत लावण्याबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी केंद्रीय मंत्री मोहोळ यांची चर्चा झाली. अखेर संरक्षण मंत्र्यांच्या भेटीनंतर २४ तासांच्या आत कार्यवाही करण्याचे आदेश देत सदरील विमान संरक्षण खात्याच्या जागेत ‘पार्क’ करण्याची परवानगी दिली.

केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, अपघातग्रस्त विमान हटवल्याने याचा मोठा दिलासा पुणेकरांना मिळणार असून, कोलमडलेले वेळापत्रक पुन्हा जागेवर येईल. १० पैकी १ बे बंद असल्याचा मोठा परिमाण झाला होता. एका दिवसाला एका पार्किंग बेवर ८ ते ९ विमानांची ये-जा होत असते. मात्र, बे बंद असल्याने याचा अतिरिक्त ताण इतर ९ बेवर आला होता आणि याचमुळे वेळापत्रक कोलमडले होते. अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष पार्किंग बेवर पाहणी केल्यानंतर संरक्षण खात्याच्या जागेत सदरील विमान पार्क करण्याचा पर्याय समोर आला. यावर तातडीने संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र पाठविले आणि भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर २४ तासांच्या आतच ही कार्यवाही झाल्याने पुणेकर प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :pune airportपुणे विमानतळLohgaonलोहगावmurlidhar moholमुरलीधर मोहोळ