शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

माउली माऊली! अखेर २ वर्षांची प्रतीक्षा संपली; भाविकांना मिळणार ज्ञानेश्वर महाराजांच्या गाभाऱ्यात "एन्ट्री"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 13:48 IST

संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीवर डोके ठेऊन नतमस्तक होऊन दर्शन घेण्याची भाविक आतुरतेने वाट पाहत होते

भानुदास पऱ्हाड 

आळंदी : संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीवर डोके ठेऊन नतमस्तक होऊन दर्शन घेण्याची भाविक आतुरतेने वाट पाहत होते. कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून बंद असलेले माऊलींच्या समाधीचे हातस्पर्श दर्शन येत्या २ एप्रिल अर्थातच चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडव्यापासून सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.  राज्यात मागील दोन वर्षांपासून कोरोना संसर्गजन्य रोगाचे सावट पसरले होते. यापार्श्वभूमीवर शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व धार्मिक स्थळे भाविकांच्या दर्शनासाठी बंद केली होती. दरम्यान अलीकडच्या काही महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याने पुन्हा एकदा मंदिरे भाविकांच्या दर्शनासाठी खुली करण्यात आली. माऊलींच्या मंदिरात भाविकांना मंदिर प्रवेशवेळी एकमेकांमध्ये सोशल डिस्टन्स पाळणे, तोंडावर मास्क वापरणे, वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करणे अशा नियमावली बंधनकारक करून मुख दर्शन दिले जात होते. मात्र भाविकांना माऊलींच्या समाधीवर डोके ठेऊन दर्शन घेण्याची आस लागून होती.             यासंदर्भात देवस्थानने विशेष बैठक आयोजित करून सर्व गोष्टींचा आढावा घेतला. या बैठकीमध्ये पाडव्याच्या मुहूर्तावर सकाळी ६ वाजल्यापासून समाधीस्पर्श दर्शन सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे भाविकांना थेट मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन माऊलींच्या संजीवन समाधीचे स्पर्श दर्शन घेता येणार आहे. कोरोनामुळे सन २०२० पासून माऊलींचे समाधीस्पर्श दर्शन बंद होते. त्यानंतर गेल्या वर्षभरापासून मुखदर्शन सुरू करण्यात आले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर समाधीस्पर्श दर्शन सुरू करावे अशी मागणी वारकरी संप्रदाय तसेच राजकीय मंडळींनी मंदिर देवस्थानकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती.

कोरोनाचे सर्व नियम पाळणे बंधनकारक

''गुढीपाडव्यापासून भाविकांना थेट मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेता येणार आहे. मात्र यावेळी कोरोनाचे सर्व नियम पाळणे बंधनकारक आहे. वृद्ध, आजारी व्यक्ती, गर्भवती माता आणि लहान बालकांनी संस्थानतर्फे सुरू असलेल्या ऑनलाइनद्वारे दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी केले आहे.''

टॅग्स :Alandiआळंदीsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वरSocialसामाजिकTempleमंदिरCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक