शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर चौथ्या दिवशी पोलीस महिलेचा मृतदेह सापडला; इंद्रायणीत मारली होती उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 15:43 IST

महिलेने नदीत उडी मारण्यापूर्वी एका मित्राला फोन केला होता

आळंदी : आळंदीतील इंद्रायणीनदीत उडी मारून आत्महत्या केलेल्या त्या महिला पोलीसाचा अखेर चौथ्या दिवशी मृतदेह सापडला आहे. अनुष्का सुहास केदार (वय २० वर्षे, रा. लक्ष्मीनारायण नगर, दिघी) असे या पोलीस महिलेचे नाव आहे. रविवारी (दि. २५) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास केदार यांनी इंद्रायणीनदीच्या नवीन पुलाजवळील गरुड खांबावरून नदीत उडी मारली होती. त्यानंतर आळंदी पोलीस, आळंदी अग्निशमन विभाग, एनडीआरएफ यांच्या पथकाकडून इंद्रायणी नदीत शोधकार्य सुरु होते. अखेर बुधवारी (दि. २८) संबंधित पोलीस महिलेचा मृतदेह गोलेगाव येथील नदीपात्रात आढळून आला आहे.            दरम्यान अनुष्का केदार यांनी नदीत उडी मारण्यापूर्वी तिच्या एका मित्राला फोन केला असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र हे टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. आळंदीतील इंद्रायणी नदीत अनुष्का केदार यांनी रविवारी (दि. २५) सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास उडी मारून आत्महत्या केली. नदीत उडी मारण्यापूर्वी तिने तिच्या एका मित्राला फोन केला असल्याचे उघडकीस आले. मात्र टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे.

अनुष्का केदार या पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत होत्या. सध्या पुणे ग्रामीण मुख्यालय येथे त्या नेमणुकीस होत्या. रविवारी सायंकाळी सव्वा पाच वाजताच्या सुमारास इंद्रायणी नदीच्या नवीन पुलाजवळ गरुड खांबावरून नदीत उडी मारली. मात्र नदीत उडी मारण्यापूर्वी अनुष्का केदार यांनी देहूफाटा आळंदी येथे राहणाऱ्या त्यांच्या एका मित्राला फोन केला होता. मी इंद्रायणी नदीत उडी मारणार असल्याचे त्यांनी फोनवर म्हटले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्या मित्राला बोलावून घेत त्याची चौकशी सुरु केली.

दरम्यान आळंदी पोलिसांकडून आळंदीपासून गोलेगाव पर्यंतच्या हद्दीत शोध घेतला जात होता. त्यापुढे पुणे ग्रामीण पोलिसांची हद्द सुरु होत असल्याने पुणे ग्रामीण पोलिसांना शोध घेण्याबाबत माहिती देण्यात आली. पुणे ग्रामीण पोलिसांकडून उजनी धरणापर्यंत असलेल्या पोलीस ठाण्यांना शोध घेण्याबाबत सांगण्यात आले आहे. अखेर संबंधित पोलीस महिलेचा मृतदेह गोलेगाव येथील नदीपात्रात आढळून आला. 

टॅग्स :Puneपुणेindrayaniइंद्रायणीPoliceपोलिसriverनदीWomenमहिलाDeathमृत्यू