शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर महिला व बालविकास मंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर तरुणीला मिळाला 'न्याय';विनयभंगाचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2020 21:27 IST

तरुणीने वारंवार तक्रार करून देखील महाविद्यालयाने तरुणाच्या 'या' कृत्याकडे केला कानाडोळा..

ठळक मुद्देमहाविद्यालयाने दखल न घेतल्याने दिली पोलिसांकडे फिर्याद

पुणे : महाविद्यालयात तरुणाने सातत्याने पाठलाग करुन मित्र-मैत्रिणीसमवेत असताना वेगवेगळ्या कॉमेट करुन विनयभंग केल्याप्रकरणी महाविद्यालयाने काहीही कारवाई केली नाही. त्यानंतर या तरुणीने आपल्याकडे सोबत घडत असलेल्या गैरप्रकाराबद्दल थेट महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकुर यांच्याकडे तक्रार केली होती. अखेर डेक्कन पोलिसांनी या तरुणीला बोलावून घेत तिने दिलेल्या फिर्यादीवरुन तरुणाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. 

शार्दुल दिलीपराव देशपांडे असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. हा सर्व प्रकार आयएलएस विधी महाविद्यालयात सप्टेबर २०१८ पासून सुरु झाला आहे. या तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, आय एल एस विधी महाविद्यालयात ही तरुणी द्वितीय वर्षात शिकत असताना वर्गात एका प्राध्यापिकेने शार्दुल देशपांडे यास गाणे गाण्यास सांगितले. त्यानुसार दुसऱ्या दिवशी शार्दुल याने हे गाणे मी तुझ्यासाठी गायले, आता मी दारुच्या नशेत आहे, असे म्हणून या तरुणीला काही मेसेज पाठविले. हा प्रकार तिने आपल्या भावाला सांगितला. त्यानंतर शार्दुलने या तरुणीला कॉलेजमध्ये अडवून त्याला समजावून सांग नाही तर त्याच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार करेल,अशी धमकी दिली. याची या तरुणीने महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे लेखी तक्रार केली. त्यानंतर ही तरुणी एकटी दिसली की, शार्दुल तिचा पाठलाग करुन बोलण्याचा प्रयत्न करीत असे. पण महाविद्यालयाकडून त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही, असे या तरुणीचे म्हणणे आहे.जानेवारी २०२० मध्ये एका प्राध्यापकांच्या लॉ क्लासमध्ये त्याने पुन्हा या तरुणीकडे पाहत गाणे गायले. त्याची तिने फेब्रुवारीमध्ये प्राचार्यांकडे तक्रार केली होती. त्यानंतरही महाविद्यालयाने काहीही कारवाई केली नसल्याने या तरुणीने महिला व बालविकासमंत्री यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर डेक्कन पोलिसांनी २३ ऑक्टोबर रोजी या तरुणीला बोलावून घेतले़ तिने दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.़़़़़याबाबत आयएलएस विधी महाविद्यालयाचे प्राचार्य संजय जैन यांनी सांगितले की, आपण कार्यभार स्वीकारल्यानंतर या तरुणीची तक्रार समोर आली होती. या विषयाकडे आम्ही संवेदनशीलपणे पाहत आहोत. महाविद्यालयात विशाखा समिती असून तिच्या तक्रारीवर कारवाई होईल, असे पत्र या तरुणीला दिले आहे.

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयPoliceपोलिस