शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

सोमवारी दिल्लीत ठरणार..! लोकसभेसाठी पुण्यात काँग्रेसचा झेंडा नेमका कुणाच्या हाती.. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2019 20:35 IST

सन २०१४ च्या निवडणुकीतही पक्षश्रेष्ठींनी पुण्यातील उमेदवार डावलून बाहेर उमेदवारी दिली. त्याचा परिणाम काय झाला ते दिसत असतानाही पुन्हा तसाच निर्णय झाला तर काय करायचे.....

ठळक मुद्देदिल्लीत सोमवारी होणारी बैठक ही स्क्रिनिंग कमिटीची बैठक केंद्रीय निवड समितीने राज्यासाठी म्हणून काही समित्या केल्या तयार फक्त अर्ज केलेल्याच नाही तर पक्षाकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या काही बाहेरच्या उमेदवारांचाही बैठकीत विचार होणार

पुणे: काँग्रेसच्या केंद्रीय निवड समितीने महाराष्ट्रासाठी नियुक्त केलेल्या स्क्रिनींग कमिटीची सोमवारी (दि. २५) दिल्लीत बैठक होत आहे. पुणे लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसचा उमेदवार कोण असेल याचा निर्णय त्यातच होण्याची शक्यता आहे. दरम्यान प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या आदेशावरून शुक्रवारी पुण्यात झालेल्या बैठकीमुळे स्थानिक इच्छुक धास्तावले आहेत. उमेदवार आयात असेल तर काय करायचे याचेच चर्चा चर्वितरण त्यांच्यात शनिवारी दिवसभर सुरू होते.शेतकरी कामगार पक्ष व त्याआधी संभाजी ब्रिगेडचे राज्य पदाधिकारी असलेले प्रविण गायकवाड तसेच सध्या भारतीय जनता पार्टीचे सहयोगी खासदार असलेले संजय काकडे या दोघांच्या नावांची काँग्रेसचे उमेदवार म्हणून गेले काही दिवस चर्चा सुरू आहे. हे दोघेही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व अजित पवार यांच्या निकटचे समजले जातात. पवारांनीच त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी मागण्यास सुचवले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच काँग्रेसच्या स्थानिक इच्छुकांमध्ये त्यांच्याविषयी नाराजी आहे.सन २०१४ च्या निवडणुकीतही पक्षश्रेष्ठींनी पुण्यातील उमेदवार डावलून बाहेर उमेदवारी दिली. त्याचा परिणाम काय झाला ते दिसत असतानाही पुन्हा तसाच निर्णय झाला तर काय करायचे यावर शनिवारी काही नेत्यांमध्ये खल सुरू होता. शुक्रवारी झालेल्या बैठकीत तरी तसेच संकेत दिसत असल्याचे स्थानिक इच्छुकांचे म्हणणे आहे. त्या बैठकीत ह्यतुमच्यात एकमत होत नाही, तर मग पक्षाने दिलेल्या उमेदवाराचे काम करावे लागेल असे स्थानिक इच्छुकांना सांगण्यात आल्याची चर्चा आहे.दरम्यान दिल्लीत सोमवारी होणारी बैठक ही स्क्रिनिंग कमिटीची बैठक आहे. केंद्रीय निवड समितीने राज्यासाठी म्हणून काही समित्या तयार केल्या आहेत. या समितीत राज्यातील काँग्रेसच्या उमदेवारांबाबत चर्चा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी असल्याने पक्षाच्या वाट्याला ४८ जागांपैकी २२ किंवा २३ जागा येण्याची शक्यता आहे. त्या जागांसाठी आलेल्या उमेदवारांबाबत कमिटीत चर्चा होईल. फक्त अर्ज केलेल्याच नाही तर पक्षाकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या काही बाहेरच्या उमेदवारांचाही बैठकीत विचार होणार आहे. त्यामुळेच स्थानिक इच्छुक धास्तावले आहेत. 

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाणElectionनिवडणूकRahul Gandhiराहुल गांधी