शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

फिल्मी स्टाईलने दरोडा टाकणारे पाच जण जेरबंद : २४ लाख हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 9:47 PM

धनकवडी भागातील शंकर महाराज मठाशेजारी असणाऱ्या पेट्रोलपंपावर काम करणारे बर्नाटदास अँथोनी हे पंपावर जमा झालेली २७ लाख ५९ हजार रुपयांची रोकड घेऊन भवानी पेठेतील बँकेत भरण्यासाठी मोटारीने २६ मार्च २०१८ रोजी निघाले होते़. त्यावेळी दोन तरुणांनी हत्याराचा धाक दाखवून ही रोकड लुबाडून नेली होती़.

पुणे : मार्केटयार्ड येथील पेट्रोल पंपावर जमा झालेली २७ लाख रुपयांची रोकड बँकेत भरण्यासाठी घेऊन जाणाऱ्यांना हत्याराचा धाक दाखवून लुटणाऱ्या ५ जणांना गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने अटक केली आहे. त्यांच्याकडून २४ लाख १२ हजार १५० रुपये हस्तगत करण्यात आले आहेत़. आहद अन्वर सैय्यद (वय २२), साकीब मेहबुब चौधरी ऊर्फ लतील बागवान (वय २०), तौसिफ ऊर्फ मोसीन जमीर सैय्यद (वय२३), जमीर अहमद हुसेन सैय्य (वय ५९, चौघेही रा़ संतोषनगर, कात्रज) आणि सुरज ऊर्फ मोटा ऊर्फ दस्तगीर शमशुद्दीन यालगी (वय १९, रा़. टिळेनगर, कोंढवा रोड, कात्रज) अशी त्यांची नावे आहेत़. अप्पर पोलीस आयुत्क प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिताराम मोरे यांनी माहिती दिली़. धनकवडी भागातील शंकर महाराज मठाशेजारी असणाऱ्या पेट्रोलपंपावर काम करणारे बर्नाटदास अँथोनी हे पंपावर जमा झालेली २७ लाख ५९ हजार रुपयांची रोकड घेऊन भवानी पेठेतील बँकेत भरण्यासाठी मोटारीने २६ मार्च २०१८ रोजी निघाले होते़. त्यावेळी दोन तरुणांनी हत्याराचा धाक दाखवून ही रोकड लुबाडून नेली होती़.पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज माहितीवरून, गुन्हे शाखेकडून गुन्ह्याचा तपास करण्यात येत होता. त्यावेळी गुन्हा केल्यानंतर सर्व जण बंगळुरु, हैदराबाद, हुमनाबाद, गुलबर्गा व इतर शहरात पळून जाऊन वास्तव्य करत असल्याचे समोर आले . त्यानंतर पोलिसांनी चेन्नई, गुलबर्गा येथे जाऊन अटक केली. या सर्वांना अटक करण्यासाठी पोलिसांनी तब्बल १२ ते १५ हजार किलोमीटरचा प्रवास करून त्यांच्याकडून गुन्ह्यात लुबाडलेली २४ लाख १२ हजार १५० रुपयांची रोकड जप्त केली.  वरिष्ठ पोलिस निरीक्षक शकुर सय्यद, सहायक निरीक्षक रविंद्र बाबर, पोलीस कर्मचारी संदीप राठोड, अतुल साठे, अनिल घाडगे, अशोक भोसले, गुणशिंलन रंगम, रोहीदास लवांडे, राजू रासगे, महेंद्र पवार, गजानन गाणबोटे, अनिल भोसले, शिवानंद स्वामी, आजिनाथ काळे, संदीप तळेकर, कल्पेश बनसोडे, सुजित पवार, संदेश निकाळजे, नागेश माळी, निलेश देसाई यांनी कारवाईत भाग घेतला. पेट्रोल भरताना सुचला प्लॅनदस्तगीर यालगी हा ४ महिन्यांपूर्वी पेट्रोल भरण्यासाठी या पेट्रोलपंपावर गेला होता़. त्यावेळी सोमवारी तेथे जास्त प्रमाणात कॅश जमा होत असल्याचे त्याने पाहिले होते़. त्यावरुन त्याला ही रक्कम लुटण्याची कल्पना सुचली़. त्यानंतर त्यांनी यासाठी संपूर्ण ड्रेस नव्याने खरेदी केले़ सिम कार्ड, मोबाईल, हँडसेट खरेदी करुन मोटारसायकल चोरली होती़. त्यानंतर दोन ते तीन सोमवारी त्यांचा हा प्लॅन फसला होता़. साकीब मेहबुब चौधरी याने २६ मार्च ला टेहाळणी करुन पेट्रोलपंपावरील लोक कधी बाहेर पडतात, याची वाट पहात थांबला होता़ ते बाहेर पडताच मोटार आडवी घालून त्यांच्या मोटारीला अडवत पुढे नेले होते़. त्यांची मोटार कोंढवा बिबवेवाडी रोडवर आल्यावर दुचाकीवरील दोघांनी हत्याराचा धाक दाखवत त्यांच्याकडील रोकड घेऊन ते पसार झाले होते़. ते देहुरोडला गेले़. तेथून ते बंगलूर, हुमनाबाद, गुलबर्गा येथे केले़ तौसिफ सैय्यद याला अटक केल्यावर त्याने यातील रोकड हैदराबाद येथे एअर होस्टेस असलेल्या बहिणीकडे व वडील जमीर हुसेन सैय्यद यांच्याकडे दिली असल्याचे सांगितले़. बहिणीने दुसºयाकडे ठेवायला दिलेली रक्कम पोलिसांनी हस्तगत केली़. मुलाला अटक केल्याचे समजताच जमीर सैय्यद हे कुटुंबासह कर्नाटकात पळून गेले होते़. त्यांना चेन्नई जवळ असलेल्या नेल्लोर येथून ताब्यात घेतले व देहुरोड येथे ठेवलेली रक्कम जप्त करण्यात आली़. तौसिफ सैय्यद याच्याविरुद्ध चार गुन्हे दाखल असून त्याला १३ फेब्रुवारी २०१७ पासून पुणे शहरातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे़ दस्तगीर यालगी याच्याविरुद्ध वाहनचोरीचे २ गुन्हे दाखल आहेत़.  

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाPoliceपोलिसPetrolपेट्रोलtheftचोरी