शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

वृद्ध आईचा सांभाळ न करणा-या मुलांच्या कुटुंबियांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 16:16 IST

वंशाचा दिवा म्हतारपणाची काठी ठरेल अशी कुटुंबातील ज्येष्ठांना आशा असते. मात्र ही काठी वृद्ध आई-वडिलांच्याच पाठी पडत असून त्यांनी कमावलेल्या संपत्तीवर डोळा ठेवून जन्मदात्यांचा छळ करीत आहेत.

ठळक मुद्देदत्तवाडी पोलिसांची कारवाई, जेवण  न देता करत होते  मानसिक छळ वृद्ध आईचा सांभाळ न करणा-या मुलांच्या कुटुंबियांवर गुन्हा दाखल

पुणे : वंशाचा दिवा म्हतारपणाची काठी ठरेल अशी कुटुंबातील ज्येष्ठांना आशा असते. मात्र ही काठी वृद्ध आई-वडिलांच्याच पाठी पडत असून त्यांनी कमावलेल्या संपत्तीवर डोळा ठेवून जन्मदात्यांचा छळ करीत आहेत. आयुष्यभर ज्यांच्यासाठी खस्ता खाल्या त्यांनीच उतारवयात अशी परतफेड केल्याने मानसिक, शारीरिक आणि आर्थिक दृष्टी दुर्बल झालेल्यांना दैनंदिन गरजा भागविण्यासाठी मुलांनी मदत करावी, म्हणून पोलीस स्टेशनमध्ये जावे लागत आहे.           मुलं संभाळ करीत नाहीत. तसेच मानसिक व शारीरिक त्रास देतात म्हणून एका ९४ वर्षीय महिलेले मुलीच्या माध्यमातून थेट पोलिसांत तक्रार केली आहे. त्यानुसार दत्तवाडी पोलिसांनी सामाजित बांधीलकी आणि शासनाच्या ज्येष्ठ नागरिक धोरणानुसार वृद्ध मातेला न्याय मिळावा म्हणून तिच्या दोन मुलांच्या कुटुंबावर गुन्हा दाखल केला आहे. संबंधित ज्येष्ठ महिला या दत्तवाडीतील लायन क्लब परिसरात रहायला आहे. त्यांना एक मुलगी आणि दोन मुले होती. मुलीची लग्न झाले असून मोठा मुलगा कोथरूड येथे राहतो तर छोट्या मुलाचे निधन झाले आहे. त्याची पत्नी व तीन मुली पीडित महिले बरोबर दत्तवाडीत राहतात.       पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २००७ साली त्या नातीला घेवून फिरण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी एका हातगाडीचा धक्का लागून त्या रस्त्यावर पडल्या. या अपघातात त्यांचा खुबा फ्रक्चर झाला होता. ऑपरेशन  झाल्याने त्या सर्व वैयक्तीक विधी जागेवरच करत. त्यामुळे सुन व नात या देखभाल न करता त्यांना शिवीगाळ करायच्या. तसेच त्यांना खायलाही वेळेवर न देता सारख्या ओरडत असत. कधीकधी अंगावर धावून येत व जीवे मारण्याच्या धमकी देत असत. या काळात मोठी नात व तिच्या पतीने घरातील इतरांच्या मदतीने त्यांना खोटी माहिती देत पीडितेच्या नावावर असलेले घर स्वत:च्या नावे बक्षिसपत्र करून त्यावर सह्या घेतल्या. त्यानंतर आता ते सर्व पीडित महिलेला घरात राहुन देत नाही. तसेच मानसिक व शारीरिक त्रास देतात. त्यामुळे त्या गेल्या १० महिन्यापासुन मुलीच्या घरी राहत आहेत. त्यामुळे त्यांची मुलगी आणि ज्येष्ठ नागरिक कक्षाने पोलिसांत तक्रार दिली आहे.            तक्रारीनुसार दत्तवाडी पोलिसांनी नातेवाईकांना बोलावुन वृद्ध आईला सांभाळण्यास सांगितले होते. मात्र कोणीही त्यांना सांभाळण्यास तयार नसल्याने पोलिसांनी सामाजिक बांधीलकी व शासनाच्या जेष्ठ नागरिक धोरणाला अनुसरुन वृद्ध मातेला न्याय मिळावा यासाठी दोन्ही मुलांच्या कुटुंबावर गुन्हा दाखल केला आहे.

पती होते सैन्यात जवानपीडित महिलेचे सैन्यात नोकरीस असणा-या जवानाशी लग्न झाले होते. नारायण पेठेत त्यांनी आपला संसार सुरू केला होता. मात्र पाणशेत दुर्घटनेत त्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी पुरग्रस्तांना दत्तवाडीमध्ये जागा देण्यात आल्या होत्या. तेव्हापासून त्या पतीसोबत तिथे राहत. पतीचे १९९० साली निधन झाले आहे. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक