शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Pune: फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यात एक्सर्बिया डेव्हलपर्सवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 15:14 IST

एकूण ४५ लाख ९२ हजार २३६ रुपये फिर्यादी यांना न देता संचालकांनी फिर्यादी यांचा विश्वासघात करुन या रक्कमेचा वापर स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी वापरली...

पुणे : प्रोजेक्टच्या कामाची वर्कऑर्डर देऊन त्याप्रमाणे काम करुन घेतल्यानंतरही बिलाची पूर्ण रक्कम न देता विश्वासघात करुन ४५ लाख ९२ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी एक्सर्बिया डेव्हलपर्स कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल केला आहे. विशाल नहार, राहुल नहार (दोघे रा. मार्केटयार्ड), सचिन पाटील, नितीन सैद अशी गुन्हा दाखल झालेल्या संचालकांची नावे आहेत. याप्रकरणी श्रीपाल सुनिल धाडीवाल (वय ३४, रा. गोकुळनगर, कात्रज कोंढवा रोड) यांनी कोथरुड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार २०१५ ते २०१६ दरम्यान घडला होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक्सर्बिया डेव्हलपर्सच्या संचालकांनी फिर्यादी यांच्या डावी भुसारी कॉलनीतील कार्यालयात घेऊन वरई, माडप, आंबी व ताडवाडी येथील प्रोजेक्टच्या कामाची वर्कऑर्डर देऊन वर्कऑर्डरप्रमाणे काम झाले की, त्वरीत ठरलेली रक्कम दिली जाईल, असे संचालकांनी विश्वास दिला. फिर्यादी यांचेकडून वर्कऑर्डरप्रमाणे काम करुन घेतले. काम केलेल्या बिलाची रक्कम ११ लाख ९६ हजार ४८ रुपये व प्रोजेक्टचे काम केल्यानंतर पूर्ण बिलाचे रक्कमेतून रिटेन्शन मनी म्हणून स्वत:कडे ३३ लाख ९६ हजार १८८ रुपये ठेवले. एकूण ४५ लाख ९२ हजार २३६ रुपये फिर्यादी यांना न देता संचालकांनी फिर्यादी यांचा विश्वासघात करुन या रक्कमेचा वापर स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी वापरली.

तसेच फिर्यादी यांची ४५ लाख ९२ हजार २३६ रुपये एवढ्या रक्कमेची आर्थिक फसवणूक करुन ग्राहकांकडून प्रोजेक्ट करीता घेतलेल्या रक्कमेचा त्या प्रोजेक्टचे कामाकरीता न करता इतरत्र वापरुन विश्वासघात केला. याप्रकरणी श्रीपाल धाडीवाल यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार कोथरुड पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीkothrudकोथरूडkothrud policeकोथरूड पोलीस