शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

भिडे गुरुजींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार्‍या हेमंत पाटील यांच्यावर संचारबंदी भंगाचा गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 13:50 IST

कोरोना विषाणूविषयी संभाजी भिडे गुरुजी यांची मुलाखत काही वृत्तवाहिन्यांमध्ये प्रसिद्ध झाली होती.

ठळक मुद्देशासनाच्या संचारबंदीचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर कारवाई

पुणे : कोरोना बाधितांना बरे करण्याचा दावा करणार्‍या संभाजी भिडे गुरुजींवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी करण्यासाठी पोलीस आयुक्तालयात आलेल्या ' भारत अगेस्ट करप्शन ' या संघटनेचे अध्यक्ष हेमंत पाटील यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी संचारबंदी भंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.देशभरात कोणतीही गोष्ट झाली की, त्याविरुद्ध न्यायालयात अर्ज करणे, पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी करुन त्याचे प्रसिद्धी पत्रक हेमंत पाटील नियमित काढत असतात. मात्र, त्यांची ही मागणी करण्याची पद्धत संचारबंदी असल्याने त्यांच्या अंगाशी आली आहे. कोरोना विषाणूविषयी संभाजी भिडे गुरुजी यांची मुलाखत काही वृत्तवाहिन्यांमध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे पत्र घेऊन हेमंत पाटील हे पोलीस आयुक्तालयातील विशेष शाखेत बुधवारी सायंकाळी आले होते. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल तांबे यांना उपनिरीक्षक रवींद्र गोडसे व हवालदार डांगे यांनी हेमंत पाटील हे आले असल्याचे सांगितले. त्यांनी संभाजी भिडे विरोधात महाराष्ट्र कोविड १९ अधिनियम कलम ६ प्रमाणे कायदेशीर कारवाई करुन अटक करण्याबाबत पत्र घेऊन आलेले आहेत असे सांगितले. ही बाब संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवेमध्ये लागू होत नसल्याने व शासनाच्या संचारबंदीचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यास कळविण्यात आले. त्यानुसार हवालदार नवनाथ डांगे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन भारत अगेस्ट करप्शन या संघटनेचे अध्यक्ष हेमंत बाबुराव पाटील (वय ५०, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी) यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी १८८ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस