किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी आठ शिवसैनिकांविरोधात पुण्यात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2022 13:02 IST2022-02-06T13:02:03+5:302022-02-06T13:02:14+5:30

धक्काबुक्कीत किरीट सोमय्या महापालिकेच्या इमारतीच्या पायऱ्यांवर कोसळले असून त्यांच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाल्याची माहिती समोर आली

Filed a case against eight Shiv Sainiks in connection with the attack on Kirit Somaiya | किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी आठ शिवसैनिकांविरोधात पुण्यात गुन्हा दाखल

किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी आठ शिवसैनिकांविरोधात पुण्यात गुन्हा दाखल

पुणे : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर शनिवारी पुणे महानगरपालिकेत हल्ला करण्यात आला होता. शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष संजय मोरे आणि त्याची काही साथीदार सोमय्या यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी निवेदन न स्वीकारल्यामुळे शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

पुणे महापालिका परिसरात असताना सोमय्या यांना काही शिवसैनिकांनी रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत किरीट सोमय्या महापालिकेच्या इमारतीच्या पायऱ्यांवर कोसळले. यात त्यांच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. याप्रकरणी पुण्याच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी सात ते आठ शिवसैनिकांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 143, 147, 149, 341, 336, 337 यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

काही शिवसैनिक सोमय्या यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे. काहीजण कारसमोर आडवे पडून सोमय्या यांची गाडी रोखण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. एका व्यक्तीनं तर सोमय्यांच्या कारची काच फोडण्याचा प्रयत्न केल्याचंही व्हिडिओतून समोर आलं आहे. 

किरीट सोमय्या यांना पुण्यातील संचेती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होत. पुणे महापालिकेच्या इमारतीच्या पायऱ्यांवर कोसळल्याने सोमय्यांच्या माकडहाडाला जबर दुखापत झाल्याची माहिती समोर आली होती. पुण्यातील संचेती हॉस्पिटलमधून सोमय्या यांना डिस्चार्ज मिळाला आहे. दुपारी ते निलम नगर मुलुंड येथे पोहोचणार आहेत. 

Web Title: Filed a case against eight Shiv Sainiks in connection with the attack on Kirit Somaiya