जिल्ह्यात टँकरची पन्नाशी... धरणे झाली रिकामी...

By Admin | Updated: February 16, 2016 01:37 IST2016-02-16T01:37:56+5:302016-02-16T01:37:56+5:30

जिल्ह्यात यावर्षी जानेवारीत २५ टँकरने सुरू असलेला पाणीपुरवठा फेबु्रवारीच्या दुसऱ्या आठवड्यात ५0 टँकरवर गेला आहे. १0 लाख ५0 हजार लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

Fifty-five tankers in the district ... | जिल्ह्यात टँकरची पन्नाशी... धरणे झाली रिकामी...

जिल्ह्यात टँकरची पन्नाशी... धरणे झाली रिकामी...

पुणे : जिल्ह्यात यावर्षी जानेवारीत २५ टँकरने सुरू असलेला पाणीपुरवठा फेबु्रवारीच्या दुसऱ्या आठवड्यात ५0 टँकरवर गेला आहे. १0 लाख ५0 हजार लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. गेल्या वर्षी या महिन्यात एकही टँकर सुरू नव्हता.
गेल्यावर्षी जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने यावर्षी वर्षभर जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागला. बारामती, इंदापूर तालुक्यात टँकर वर्षभर सुरूच होते. जानेवारीपासून टंचाईची दाहकता तीव्र होऊ लागल्याने पुन्हा टँकर वाढले असून आजच्या तारखेला ५0 टँकरने जिल्ह्यात पाणीपुरवठा सुरू आहे. पाणीटंचाईची झळ सध्या यात बारामती, पुरंदर, इंदापूर व दौैंड तालुक्यात जास्त असून यावर्षी टँकरची संख्या २00 पर्यंत जाण्याची भीती प्रशासन व्यक्त करीत आहे
विभागात गेल्या तीन-चार वर्षांपासून सलग पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गतवर्षी काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. यंदा ऐन पावसाळ््यात देखील ३०-४० टँकर सुरूच होते. यंदा विभागात सलग अडीच महिने पावसाने दडी दिली होती. सप्टेंबर महिना उजाडला तरी पावसाची ओढ कायम होती़ यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे.पुणे जिल्ह्यात २५ धरणे असून त्यांचा पाणीसाठा खूपच कमी झाला आहे. त्यामुळे पाणलोट क्षेत्रात पाण्यासाठी ग्रामस्थांची पायपीट सुरू आहे. त्यात भोर तालुक्यातील धरणांतून गेल्या काही दिवसांपसून मोठा विसर्ग झाल्याने भाटघर, नीरा देवघर धरणाची पातळी खालावली आहे. या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात आता तीव्र पाणीटंचाई सुरू आहे. मात्र ५0 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडलेल्या ठिकाणी टँकर मंजूर होत नसल्याने या गावांना टँकरही मिळत नाही.

Web Title: Fifty-five tankers in the district ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.