शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

बदनामी करण्याची धमकी देत मुलीवर केला अत्याचार, तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 17:26 IST

मुलगी राहिली साडेपाच महिन्याची गरोदर, एका तरूणाविरोधात गुन्हा दाखल

ठळक मुद्देमुलीने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देताच दिली बदनाम करण्याची धमकी

लोणी काळभोर: पंधरा वर्षाच्या लहान मुलीला बदनाम करण्याची धमकी देऊन तिच्या इच्छेविरूद्ध शारीरीक संबंध प्रस्थापित करणाऱ्या तरूणाविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणाच्या असल्या वाईट कृत्याने मुलगी साडेपाच महिन्याची गरोदर असल्याचे समोर आले आहे.

 मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून चेतन वसंतराव कोटमाळे ( वय २७, रा. आळंदी रोड, पुणे ) याच्याविरोधात बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ वर्षांची मुलगी आपल्या आईबरोबर मामाकडे राहत आहे. गेल्या २, ३ महिन्यांपासून मुलगी व्यवस्थित जेवण करत नसल्याचे मामीच्या लक्षात आले. मामीने तिला विचारल्यावर ती काहीच सांगण्यास तयार नव्हती. मुलीचे दात दुखत असल्याने ती जेवत नसेल असे त्यांना वाटले.   त्यानंतर तिला तपासणी करण्यासाठी १५ मेला रूग्णालयात नेले. सोनोग्राफी रिपोर्ट पाहून डॉक्टरांनी ती साडेपाच महिन्याची गरोदर असल्याचे सांगितले. त्यानंतर आई व मामीने तिला विश्वासात घेऊन विचारणा केली. तिने चेतन आणि तिच्यामधील घडलेला सर्व प्रकार सांगितला.

चेतन हा मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये घरी येत असे. त्यामुळे त्याच्याबरोबर मुलीची ओळख झाली. त्यानंतर त्याने मुलीला मोबाईल नंबर मागितला. पण तिने नकार दिल्यावर बदनामी करण्याची धमकी दिली. त्यावर घाबरून मुलीने आजीचा मोबाईल नंबर त्याला दिला. वारंवार फोन करुन तो मुलीला प्रेम असल्याचे सांगू लागला. तसेच इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवण्याचे बोलू लागला. एके दिवशी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घरातील सर्वजण झोपल्यावर त्याने फोन करुन टेरेसवर बोलवले. तिने वाईट कृत्य करण्यास नकार दिल्यावर बदनामी करण्याची धमकी दिली. त्याच क्षणी त्याने जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतरही परत याची पुनरावृत्ती झाली. असे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आईने दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकLoni Kalbhorलोणी काळभोर