शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हाेणार की पुढे ढकलणार? आज फैसला, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष
2
आजचे राशीभविष्य, २५ नोव्हेंबर २०२५: प्रियजनांचा सहवास लाभेल, प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल!
3
अयोध्या नगरीत श्रीराम मंदिरावर आज दिमाखात फडकणार भगवा ध्वज, वास्तूचे काम पूर्ण झाल्याचे प्रतीक; ध्वजावर तेजस्वी सूर्य, ॐ ही प्रतीकेही, अयोध्येत कडक सुरक्षा
4
‘अनामिक’ रोख देणग्यांबद्दल कोर्टाची भाजप, काँग्रेस आणि सरकारला नोटीस!
5
सिम इतरांना द्याल तर तुरुंगात जाल, दूरसंचार विभागाचा इशारा
6
पती, सासरच्या जाचापायी राज्यात २,३७३ महिलांनी संपविले जीवन, २०२३ मध्ये देशभरात २४ हजार जणींनी उचललं टोकाचं पाऊल
7
कुणावरही टीकाटिप्पणी नाही, केवळ विकासाचे मुद्दे, मुख्यमंत्री प्रचारात फडणवीसांचा व्हिजनवर भर, विरोधकांवरही टीका नाही
8
चायनीज तैपईला नमवून भारताच्या महिला कबड्डीपटूंनी पटकावला विश्वचषक
9
१५ वर्षांत कोणती वस्तू किती महागली? खिसा कसा रिकामा?
10
भारतीय वंशाचे उद्योगपती मित्तल सोडणार ब्रिटन, समोर येतंय असं कारण
11
कर्ज हवे? चिंता करू नका; तुमचे भविष्य सुरक्षित, तर बॅंका निश्चिंत
12
कंपन्यांच्या पगार खर्चात १०% वाढ होणार, नव्या कायद्यामुळे भार; अनेक जबाबदाऱ्याही पडणार
13
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? शांतता योजनेचा मसुदा तयार; पण युक्रेनसमोर मोठे दुहेरी संकट!
14
भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?
15
इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
16
नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
17
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
18
चंद्रपूर पुन्हा हादरले; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम शिक्षकास अटक
19
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
20
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
Daily Top 2Weekly Top 5

कठुआ अत्याचाराविरोधात तीव्र संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 03:26 IST

कठुआ आणि उन्नाव येथील झालेल्या बलात्कार व निघृण खून प्रकरणाचे पडसात देशभरात उमटत आहे. या घटनांच्या निषेधार्थ फर्ग्युसन रस्त्यावरील गुडलक चौकात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच बलात्काराच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी विविध घटनांच्या वतीने गुडलक चौक ते ज्ञानेश्वर पादुका चौक दरम्यान मोर्चा काढण्यात आला होता. अनेक नेटकरी या मोर्चात सहभागी झाले होते.

पुणे - कठुआ आणि उन्नाव येथील झालेल्या बलात्कार व निघृण खून प्रकरणाचे पडसात देशभरात उमटत आहे. या घटनांच्या निषेधार्थ फर्ग्युसन रस्त्यावरील गुडलक चौकात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच बलात्काराच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी विविध घटनांच्या वतीने गुडलक चौक ते ज्ञानेश्वर पादुका चौक दरम्यान मोर्चा काढण्यात आला होता. अनेक नेटकरी या मोर्चात सहभागी झाले होते.मोर्चादरम्यान काही विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. बलात्कारांना फाशी झालीच पाहिजे, मोदी सरकार जागे व्हा, वी वाँट जस्टिस, असिफा हम शर्मिंदा है, तेरे कातील जिंदा है, अशी घोषणाबाजी करीत यावेळी अनेकांनी जस्टिस फॉर असिफाचे फलक हाती घेतले होते. असिफाला न्याय मिळावा म्हणून नेटकऱ्यांनी व्हॉट्सअ‍ॅपला काळ्या रंगाचे डीपी ठेवले होते. तसेच विविध व्हॉट्सअ‍ॅप गु्रपवर असिफाला न्याय मिळावा म्हणून पुढील २४ तास काळे डीपी ठेवावेत, असे आवाहन करण्यात येत होते. त्यामुळे अनेकांनी आपले डीपी बदलेले होते. तर फेसबुकवर #्न४२३्रूीऋङ्म१ङं३ँ४ं#ख४२३्रूीऋङ्म१वल्लल्लंङ्म टॅग करत अनेक पोस्ट टकण्यात आल्या होत्या. महिलांवर होणाºया अत्याचाराबाबत आम्ही वेळोवेळी आवाज उठवला आहे. तसेच, हे प्रकार कमी व्हावेत म्हणून कडक कायदे अस्तित्वात आणण्यासाठी आंदोलने केली. मात्र, या कायद्यांची अंमलबजावणी करणारेच महिलांवर अत्याचार करीत आहेत. तर राज्यकर्ते व पोलीस त्यात सहभागी होताय. अस्मिेतेच्या राजकारणात महिलांचा बळी जात आहे, अशी भावना यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या किरण मोघे यांनी व्यक्त केली. साधना दधिच, अंजली आंबेडकर, सुनीती सु. र., बेनझीर तांबोळी, स्त्रीवादी कार्यकर्त्या मेधा थत्ते, सुरेखा गाडे, विचारवंत अन्वर राजन, विलास, वर्षा गुप्ते, मयूरी, नसरीन तसेच मकबूल आणि रुक्साना पाटील या विद्यार्थ्यांनीदेखील यांनी आपले विचार मांडले. तर उपमहापौरडॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी मोर्चास पाठिंबा दिला.आपकडूनही निषेध : जम्मूमध्ये बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या समर्थनार्थ भाजपा सरकारमधील काही लोकांनी काढलेला मोर्च्याच्या व उत्तर प्रदेशमध्ये उन्नाव येथे भाजपा आमदार आणि त्याच्या साथीदारांनी एका मुलीवर केलेला अत्याचार व न्याय मागण्यासाठी पुढे आलेल्या तिच्या वडिलांचा पोलिसांकरवी केलेला खून या दोन्ही प्रकरणांचा निषेर्धात आम आदमी पक्षाच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर चौकात निदर्शने करण्यात आली.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या