शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण क्षेत्रात खळबळ! प्राथमिक शाळेतील शिक्षकाने केला अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 21:00 IST

पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना....

भिगवण : येथील एका प्राथमिक शाळेतील शिक्षकाने सहावीतील अल्पवयीन विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करून गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तर याच शिक्षकाने अनेकदा हा प्रकार करूनही शिक्षण विभागाने त्याला पाठीशी घातल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मुलीच्या पालकांनी भिगवण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून भिगवण पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने पथक तयार करून आरोपीला अटक केली.

भिगवण परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हा घृणास्पद प्रकार घडला. ६ वी च्या वर्गात शिकणाऱ्या लहान मुलीला एकटीला वर्गात गाठून तिच्याशी अश्लील चाळे करत गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चाणाक्ष मुलीने स्वत:ची सुटका करीत पळ काढला. घरी धाव घेत झालेल्या सर्व प्रकाराची माहिती आई-वडिलांना दिली. या घटनेमुळे पालक पुरते हादरून गेले आणि याची माहिती संबंधित शाळेतील प्रभारी मुख्याध्यापक यांना दिली. मात्र, शाळा प्रशासनाने चोवीस तास उलटूनही याची साधी चौकशी देखील केली नाही. त्यामुळे पालकवर्गात मोठा असंतोष पाहावयास मिळाला.

या घटनेची माहिती पालकांना समजताच त्यांनी शाळेत धाव घेत शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांनी पोलीस पथकासह भेट देत पालकांना आरोपी विरोधात गुन्हा नोंद झाला असून आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच प्रभारी मुख्याध्यापक यांनी या प्रकाराची माहिती वरिष्ठांना दिली असून त्यांच्या सूचनेने पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती दिली. तर या गंभीर प्रकारानंतरही गटशिक्षण अधिकारी यांनी दुसऱ्या दिवशी शाळेला भेट दिली.

गट शिक्षण अधिकारी अजिंक्य खरात यांनी या प्रकरणी चौकशी समिती नेमून आरोपी विरोधात कठोरात कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितले. तसेच भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांनी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी सक्षम तपास केला जाणार असल्याचे सांगितले.

विद्येच्या मंदिरात या विकृत शिक्षकाने यापूर्वीही असे प्रकार केल्याची माहिती मिळत आहे. तर ४ महिन्यांपूर्वी असाच प्रकार उघडकीस आला असताना शाळा प्रशासनाने माफीनामा लिहून घेत झाल्या प्रकारावर पडदा टाकण्याचे काम केले. दरम्यान इतर मुलींसोबत देखील असा विकृत प्रकार केल्याचे शाळेतील इतर मुलींनी बोलताना सांगितले.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीBhigwanभिगवणMolestationविनयभंग