शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

राहूतील खेडेकरमळा येथे बिबट्या मादी पिंजऱ्यात जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 12:56 IST

परिसरात मोठ्या प्रमाणात ऊसाची शेती असल्याने या बिबट्यांंचा मुक्तपणे वावर आहे.

राहू - दौंड तालुक्यातील राहू परिसरात गेल्या महिनाभरापासून अगदी मुक्तपणे संचार करुन जनावरांवर व पाळीव प्राण्यांवर हल्ले करत लचके तोडून धुमाकूळ घालणारी तसेच शेतकरी, ग्रामस्थांची झोप उडवणारा बिबट्या मादी अखेर सोमवार (दि. १६)रोजी पहाटेच्या सुमारास वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाली आहे.यामुळे भयभीत झालेल्या शेतकरी, ग्रामस्थांचा जीव भांड्यात पडला.राहू (ता. दौंड) परीसरात देवकरवाडी,पाटेठाण, पिलाणवाडी, डूबेवाडी, दहीटणे,टेळेवाडी, वाळकी, कोरेगाव भिवर,मिरवडी, मगरवाडी आदी गावांच्या परिसरात या बिबट्यांंची पैदास मोठ्या प्रमाणात वाढली असून याठिकाणी वन्य प्राण्यांनी अक्षरश: धुमाकुळ घातला आहे.या परिसरातील अनेक जनावरे व पाळीव प्राण्यांचा फडशा पाडलेला आहे.परिसरात मोठ्या प्रमाणात ऊसाची शेती असल्याने या बिबट्यांंचा मुक्तपणे वावर आहे.काही दिवसापूर्वी या भागात बिबट्याचे तीन लहान बछडे सापडले होते.यामुळे या भागात बिबट्या असण्याची शक्यता बळावली होती.या बिबट्याच्या दहशतीमुळे या भागात भीतीचे वातावरण होते.शेतकरी वर्ग व शेतमजूर यांना शेतीची कामे करताना या बिबट्याच्या दहशतीखाली कामे करावी लागत होती.खेडेकर मळ्यात वनविभागाने दोन दिवसापूर्वी सायंकाळच्या सुमारास पिंजरा लावला होता.अखेर आज बिबट्यास वनविभागाला जेरबंद करण्यात यश आले.बिबट्या मादी असून तीन वर्षे वयोगटातील आहे.बावधन येथील रेस्क्यू सेंटर येथे प्राथमिक तपासणीसाठी हलविण्यात आले आहे.दौंड तालुका वनाधिकारी राहुल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडल अधिकारी अंकुश थोरात,राहू येथील वनरक्षक गणेश मस्के,वनसेवक सुरेश पवार,भानुदास कोळपे,दत्तात्रय खोमणे,तेजस ठाकर, गणेश चौधरी यांनी या बिबट्यास जेरबंद करण्यास परीश्रम घेतले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रleopardबिबट्याpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडforestजंगलforest departmentवनविभागdaund-acदौंड