शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

केस घेतली नाही म्हणून महिला वकिलाचा नातेवाईकानेच केला विनयभंग, पुण्यातील घटना

By नितीश गोवंडे | Updated: April 25, 2024 14:42 IST

हडपसर येथे राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे....

पुणे : केस घेतली नाही याचा राग मनात धरून महिला वकिलाचा हात पकडून विनयभंग केला. तसेच महिलेचे फोटो ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना दाखवण्याची धमकी दिली. हा प्रकार शिवाजीनगर येथे बुधवारी (दि. २४) सकाळी अकराच्या सुमारास घडला. याप्रकरणी २७ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत हडपसर येथे राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पीडित महिलेच्या आईचा आतेभाऊ असलेल्या इसमावर विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आरोपीची केस घेण्यास नकार दिला होता. याचा राग आरोपीच्या मनात होता. बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास फिर्यादी त्यांच्या ऑफिसमध्ये जात होत्या. त्यावेळी आरोपीने केस घेतली नाही याचा राग मनात धरून फिर्यादी यांच्या ऑफिसच्या पार्किंगमध्ये हात पकडून जोरात ओढले. तु माझी केस घेतली नाही, माझ्याकडे तुझे फोटो आहेत. ते मी तुझ्या ऑफिसमधील सगळ्यांना दाखवेन. तुला या ऑफिसमध्ये काम करु देणार नाही, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सपकाळे या करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेMolestationविनयभंगCrime Newsगुन्हेगारी