शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

निर्भयपणे सण साजरी करा वटपोर्णिमा : दिवसभर असणार कडक '' पोलीस वॉच''  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2019 20:54 IST

गतवर्षी वटपोर्णिमेच्या दिवशी मंगळसुत्र चोरट्यांनी शहरात चार तासात धुमाकुळ घालून दहशत निर्माण केली होती़.

ठळक मुद्देसकाळी सहापासून पोलिसांची नाकाबंदी, रात्रभर गुन्हेगारांचे चेकिंग            

पुणे : गतवर्षी वटपोर्णिमेच्या दिवशी मंगळसुत्र चोरट्यांनी शहरात चार तासात धुमाकुळ घालून दहशत निर्माण केली होती़. त्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस दलाने उद्या रविवारी सकाळी सहा वाजल्यापासून नाकाबंदीला सुरुवात करण्यात येणार असून महिलांना वटपोर्णिमा निर्भयपणे साजरी करता यावी, यासाठी शहरातील बंदोबस्तात वाढ केली आहे़. गेल्या वर्षी वटपोर्णिमेच्या दिवशी एका मोटारसायकलवरील दोघा चोरट्यांनी कॅम्पपासून शिवाजीनगर, थेट सांगवी, बाणेर, मार्केटयार्ड अशा शहराच्या महत्वाच्या सर्व भागात फिरुन तब्बल १२ महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेले होते़. सुमारे साडेपाच लाख रुपयांचा ऐवज हिसकावून नेताना त्यांनी शहरात चार तास धुमाकुळ घालत एकच खळबळ उडवून दिली होती़. काही दिवसांनी या दोघा चोरट्यांना पकडण्यात खडक पोलिसांना यश मिळाले होते़. या पार्श्वभूमी वटपोर्णिमा शहरात पोलिसांनी रविवारी मोठा बंदोबस्त लावला आहे़. अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी शनिवारी सायंकाळी गुन्हे शाखेच्या सर्व युनिटची बैठक घेऊन उद्याच्या बंदोबस्ताची माहिती सर्वांना देऊन आवश्यक ती काळजी घेण्याचे आदेश दिले आहे़. त्यानुसार शनिवारी रात्री संपूर्ण शहरात काँबिंग आॅपरेशन राबविण्यात येणार आहे़. शहरात मंगळसुत्र चोरणारे जवळपास ४० ते ४५ रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत़. त्याची रात्री चेकिंग करण्यात येणार असून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे़. बाहेरील शहरातून येऊन मंगळसुत्र चोरी करणाºया अनेक टोळ्या आहेत़ त्या सध्या कोठे आहेत, त्याची तपासणी केल्या आठवड्यापासून सुरु करण्यात आली असून संबंधित पोलीस ठाण्यांना त्याची माहिती देण्यात आली आहे़. याशिवाय शहरातील सर्व लॉज, हॉटेलची तपासणी करण्यात येणार आहे़. शहरातील मंदिरे तसेच जेथे वटपोर्णिमा साजरी करण्यासाठी महिला एकत्र येतात, अशा ठिकाणी व परिसरात बंदोबस्त ठेवण्याचे आदेश प्रत्येक पोलीस ठाण्याला देण्यात आले आहेत़. याशिवाय १२ हॉर्ट स्पॉट निवडण्यात आले असून तेथे बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे़. शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना त्यांच्या हद्दीत बंदोबस्त वाढविण्यास सांगण्यात आले आहे़. ...............याबाबत पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांनी सांगितले की, वटपोर्णिमेला सकाळी ६ वाजल्यापासून शहरात नाकाबंदी करण्यात येणार आहे. गेल्या आठ दिवसांपासून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करुन त्यांच्यावर प्रतिबंधकात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. जेथे वटाची पुजा होते, त्या परिसरात विशेष बंदोबस्त ठेवण्याचे आदेश त्या त्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना देण्यात आले आहेत. उद्या मोठ्या प्रमाणावर संपूर्ण शहरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात येणार आहे.वटपोर्णिमेच्या सणानिमित्त पोलिसांनी सर्व आवश्यक ती काळजी घेतली असून नागरिकांनी निर्भयपणे सण साजरा करावा, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ़ के़ व्यंकटेशम यांनी केले आहे़. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसtheftचोरी