पोलिसांच्या भीतीने स्वत:वर केले ब्लेडने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:11 AM2021-05-16T04:11:40+5:302021-05-16T04:11:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क लोणी काळभोर : घरफोडीतील संशयित गुन्हेगाराने पोलीस पाठलाग करताहेत हे लक्षात येताच स्वत:वर चाकूने व ब्लेडने ...

Fearing the police, he stabbed himself | पोलिसांच्या भीतीने स्वत:वर केले ब्लेडने वार

पोलिसांच्या भीतीने स्वत:वर केले ब्लेडने वार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

लोणी काळभोर : घरफोडीतील संशयित गुन्हेगाराने पोलीस पाठलाग करताहेत हे लक्षात येताच स्वत:वर चाकूने व ब्लेडने वार करत आत्महत्येचा प्रयत्न करत पळून जाण्याचा प्रयत्न केला. जवळपास ८ किलोमीटर पोलिसांनी या चोरट्याचा पाठलाग करत अखेर त्याला जेरबंद केले. ही घटना शुक्रवारी पहाटे उरळी देवाची (ता. हवेली) हद्दीत घडली आहे.

बल्लुसिंग प्रभुसिंग टाक ( वय ३०, रा. धनगरवस्ती, उरुळी देवाची, ता. हवेली, मूळ रा. रामटेकडी, हडपसर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार: ४ मे रोजी चोरट्यांनी एका घरातील रोख रकमेसह एक एलईडी टीव्ही, सेटअप बॉक्स व एक डिव्हीआर असा एकूण ५० हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना मंतरवाडी (ता. हवेली) येथे घडली होती. यासंदर्भात, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शोध पथकाचे अधिकारी आरोपीचा शोध घेत होते. यामध्ये बल्लुसिंग याचे नाव निष्पन्न झाले. पोलिसांना त्याच्या ठिकाण्याची माहिती मिळाताच उरुळी देवाची येथे त्याच्या घराजवळ सापळा रचण्यात आला. मात्र पोलिसांची चाहूल लागताच त्यांंना चकवा देत दुचाकीवरून पळुन जावू लागला. पुढे उरुळी देवाची हद्दीतील पालखी रोड खिंड येथील डोंगरावर त्याने आपली दुचाकी चढवली. परंतू दगडगोट्यांमुळे ती घसरली. ती तेथेच सोडून पुढे डोंगरावर पळू लागला. पोलीस पथक त्याचा पाठलाग करत होते. ते जवळ येऊ नयेत म्हणून त्याने वरून दगडफेक केली. परंतु पोलिसांनी ती शिताफीने चुकवली. पोलीस त्याचे जवळ पोहोचले. ते आपल्याला पकडतील म्हणून त्याने त्याच्याकडील चाकूने स्वत:च्या दोन्ही हातावर कापून नंतर खिशातील ब्लेड काढून स्वत:च्या हातावर, छातीवर व पोटावर कापून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्याला जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.

Web Title: Fearing the police, he stabbed himself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.