शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

इंदापुर तालुक्यात लॉकडाऊनमुळे रोपवाटिकेतील २५ लाख गुलाब,शोभेची रोपे वाया जाण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 17:41 IST

कोरोनाचा रोपवाटिका धारक व्यवसायाला फटका; कोट्यावधी रुपयांचे नुकसान होणार

ठळक मुद्देअहमदाबाद,विजापूर, पुणे,लातूर, नांदेड, उस्मानाबाद या ठिकाणी रोपांना मोठी मागणी

सतिश सांगळेकळस : राज्यात कोरोनाचा संसर्ग फैलाव टाळण्यासाठी संचारबंदी घोषित झाल्याने लॉकडाऊनमध्ये रोपवाटिका धारकांचे मोठे नुकसान झाले आहे .कळस (ता.इंदापुर) येथील तयार रोपांना ग्राहकच नाही .वाहतूक व्यवस्थाही ठप्प असल्याने रोपवाटिकेतील सुमारे २५ लाख गुलाब, व शोभेची रोपे वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे .त्यामुळे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होणार आहे.

 इंदापुर तालुक्यातील कळस या ठिकाणी गेली ३० वर्षांपासून रोपवाटिका व्यवसाय आहे. प्रामुख्याने या ठिकाणी गुलाब रोपांची निर्मिती केली जात होती .याठिकाणी दरवर्षी सुमारे २५ लाख रोपांची निर्मिती केली जाते .तसेच येथील रोपवाटीका धारकांनी विस्ताराने सर्व रोपे तयार करून आपल्या व्यवसायाला मोठे स्वरुप दिले .या ठिकाणी लहान मोठ्या सुमारे ५०रोपवाटिका आहेत .येथील तसेच यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील सदस्यांची संख्या सुमारे ५०० आहे .तसेच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शेकडो महिलांना यामुळे रोजगार उपलब्ध होत होता. त्यांचेही नुकसान झाले आहे.आपल्या व्यवसायात रोपवाटिका मालकांनी चांगली प्रगती साधली होती .मात्र,कोरोनाचा फैलाव झाल्याने संचारबंदी जाहीर करण्यात आली.अत्यावश्यक सेवा वगळता सर्व वाहतूक बंद झाली .त्यामुळे रोपवाटिकाधारकांचा विक्रीचा माल वाया जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येथील रोपांना आंध्रप्रदेश मधील राजमंड्री,गुजरात मधील अहमदाबाद, कर्नाटक मधील विजापूर व राज्यातील पुणे,लातूर, नांदेड, उस्मानाबाद या ठिकाणी मोठी मागणी असते. विक्रीचा काळ लोटलाअसल्याने गुलाबाची कळीधारण केलेली रोपे फेकून द्यावी लागणार आहेत.यामुळे लाखोंचा खर्च पाण्यात गेला आहे. तसेच नियमित विक्रीची लिंब,चिंच,अशोक, गुलमोहर, करंज, अर्जुन, जांभूळ, बेहडा, हिरडा, बदाम,निलगिरी, बांबू, रेन ट्री,पारिजातक, फायकस, या शोभेच्या नाशवंत मालाचीप्रत खराब होऊन नुकसान सोसावे लागणार आहे. उन्हाळी हंगामात शोभेच्यारोपांना चांगली मागणी असते .पणलॉकडाऊनमुळे वाहतूक बंद असल्याने माल पडूनराहिला आहे.———————————————...लाखोंच्या पटीत रोपवाटिका धारकांचे नुकसान

उत्पादित मालाला प्रतिरोपाला संगोपन करताना मोठा खर्च येत आहे.रोपवाटिका धारकांनी हजारोंच्या पटीत माल तयार केला आहे. त्यामुळे लाखोंच्या पटीत रोपवाटिका धारकांचे नुकसान होत आहे विलास पानसरे, कळस (रोपवाटीका धारक)—————————————————

टॅग्स :IndapurइंदापूरFarmerशेतकरीbusinessव्यवसायCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस