शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

भय इथले संपत नाही...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 16:53 IST

अठराविश्व दारिद्र्य उराशी बाळगून अशिक्षित पिढी सांभाळताना नाकेनऊ आलेली कुटुंबे प्रगत अशा श्रीगोंदा तालुक्यात ढोकराईच्या माळावर आली आहेत.

विजय उंडेमढेवडगाव : अठराविश्व दारिद्र्य उराशी बाळगून अशिक्षित पिढी सांभाळताना नाकेनऊ आलेली कुटुंबे प्रगत अशा श्रीगोंदा तालुक्यात ढोकराईच्या माळावर आली आहेत. समाजापासून कोसो दूर असलेल्या या कुटुंबांची अवहेलना पाहून मन सुन्न होऊन जाते. भिक्षुकीवरच उदरनिर्वाह करणारी कुटुंबे राईनपाड्याच्या घटनेनंतर अजूनही भेदरलेली आहेत.नगर-दौड महामार्गालगत नागवडे साखर कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुतर्फा असलेल्या जोशी, गोपाळ, वैदू, नंदीवाले, नाथपंथी डवरी गोसावी, तेलवाला समाज, गवळी, पारधी अशा महाराष्ट्रात दुर्मिळ असणाºया अनेक वेगवेगळ्या पंथांच्या भटक्या जमाती येथे गुण्यागोविंदाने राहताहेत. धुळे जिल्ह्यातील राईनपाडा हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर या परिसराला भेट दिली असता अनेक विदारक बाबी समोर आल्या.दारिद्र्य किती विदारक असतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हा तांडा. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजाही या तांड्यापर्यंत अजून पोहोचलेल्या नाहीत. शिक्षणाचा पूर्णपणे अभाव असल्याने व लहान लहान मुले उघडी-नागडी फिरताना या तांड्यावर चोहीकडे दिसतात. यांचे उदरनिवार्हाचे मुख्य साधन व व्यवसाय भिक्षुकी मागणे.राईनपाड्यामुळे यातील सर्वच कुटुंबे भेदरलेली आहेत. पुरुषमंडळी घर सोडायला तयार होत नाहीत. या समाजातील पुरुषांना व स्त्रियांना दुसरा व्यवसाय येत नाही. त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. यांना शिधापत्रिका नाही. नावाची ओळख नाही. त्यामुळे शासनाच्या कोणत्याही सोयीसुविधा यांच्यापर्यंत पोहचतच नाहीत. (पूर्वार्ध)मुलांचे भविष्य काय?महिलांच्या व पुरुषांच्या अंगावर मागून आणलेले जुने-पुराने कपडे आहेत. नवीन कपडे हे सणासुदीलाही घालत नाहीत. त्यांच्या मुलांची नावे विचारली असता एका पाच वर्षांच्या मुलाने रणबीर व दुसºयाने सलमान अशी नावे सांगितली. रणबीर व सलमानच्या अंगावर बोटभर कपडा नव्हता. प्रश्न पडतो या रणबीर व सलमानचे भविष्य काय?

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा