खेड तालुक्यात मेंढपाळांमध्ये भितीचे वातावरण! बिबट्यांचा वावर वाढला, मेंढ्यावर होतायेत हल्ले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 01:28 PM2021-06-09T13:28:13+5:302021-06-09T13:28:39+5:30

बिबट्याच्या हल्यात एक मेंढी मृत तर दोन मेंढया गंभीर जखमी, मेंढपाळाचे ६ हजार रुपायांचे नुकसान

Fear among shepherds in Khed taluka! Leopards are rampant, sheep are being attacked | खेड तालुक्यात मेंढपाळांमध्ये भितीचे वातावरण! बिबट्यांचा वावर वाढला, मेंढ्यावर होतायेत हल्ले

खेड तालुक्यात मेंढपाळांमध्ये भितीचे वातावरण! बिबट्यांचा वावर वाढला, मेंढ्यावर होतायेत हल्ले

Next
ठळक मुद्देदावडी परिसरात उन्हाळी पिकांचे क्षेत्र वाढले आहे हे क्षेत्र बिबट्यांचे आश्रयस्थान बनत चालले आहे

दावडी: खेड तालुक्यतातीळ दावडी येथे बिबट्याच्या हल्यात एक मेंढी मृत तर दोन मेंढया गंभीर जखमी झाल्या आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्यांचे हल्ले बंद झाले होते. मात्र आता पुन्हा हल्ले होवू लागल्याने मेंढपाळांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दावडी परिसरातील होरेवस्ती येथे मेंढपाळ संतोष डुले यांचा मेंढपाळ वाडा आहे. मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात एकमेढी जागीच ठार झाली तर दोन मेंढया गंभीररित्या जखमी झाल्या आहेत. दरम्यान मेंढपाळ संतोष डुले यांनी काठी घेऊन बिबट्याला हुसकावून लावले. अन्यथा अजून मेंढयावर बिबट्याने हल्ला केला असता. बिबट्याच्या हल्ल्यात मेंढपाळाचे ६ हजार रुपायांचे नुकसान झाले असुन घटनास्थळी वनपाल सुषमा चौधरी यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे. या परिसरात वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याच्या भीतीपासून ग्रामस्थांची सुटका करण्याची मागणी सरपंच आबा घारे आणि ग्रामस्थांनी केली आहे. 

दावडी परिसरात उन्हाळी पिकांचे क्षेत्र वाढले आहे हे क्षेत्र बिबट्यांचे आश्रयस्थान बनत चालले आहे.  सध्या ऊसतोड होऊन उसाचे रान मोकळे होत असल्याने बिबट्यांचा वावर इतर क्षेत्रांत वाढत आहे. गेल्या आठ दिवसापासुन बिबट्याचा वावर व उपद्रव दिसत येथे दिसत आहे. काही महिन्यापुर्वी या परिसरात बिबट्याने शेळ्या मेंढया वर हल्ले केले होते.

बिबट्याचा वावर वाढला असुन येथील शेतकऱ्यांनी शेतात उन्हाळी पिके घेतली आहेत. मात्र भितीपोटी शेतकरी शेतात जात नाहीत. शेतकरी भयभयीत झाले असून कारण बिबट्या झाडा-झुडपात दबा धरून बसलेला असेल अन् तो केव्हा हल्ला करेल याचा भरोसा नाही. यामुळे शेतकरी भयभयीत झाले असुन या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

Web Title: Fear among shepherds in Khed taluka! Leopards are rampant, sheep are being attacked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.