शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

एफडीएकडून पुणे जिल्ह्यात तब्बल ३ कोटींचा गुटखा जप्त; बंदी असूनही सर्रास विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 6:44 PM

राज्यात गुटखा बंदी असून गेल्या वर्षभरात अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) पुणे जिल्ह्यात तब्बल ३ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला.

ठळक मुद्देमहाराष्ट्रासह देशात २५हून अधिक राज्यात गुटख्यावर बंदीगुटख्याचा काळाबाजार करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे, मोका अंतर्गत कारवाई व्हावी : जगदीश मुळीक

पुणे : राज्यात गुटखा बंदी असून गेल्या वर्षभरात अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) पुणे जिल्ह्यात तब्बल ३ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला. मात्र, पुणे शहरासह, उपनगर परिसरात व जिल्ह्यातील ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी गुटख्याचा काळाबाजार सुरूच असल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे गुटखा बंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संबंधितांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोका) कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.गुटख्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याने महाराष्ट्रासह देशात २५हून अधिक राज्यात गुटख्यावर बंदी घालण्यात आली. परंतु, महाराष्ट्राशेजारील राज्यांमधून पुण्यासह प्रमुख शहरांमध्ये गुटख्याचा मोठ्याप्रमाणावर काळाबाजार केला जात आहे. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी वेळेवेळी कारवाई करून गुटख्याचे अनेक ट्रक, टेम्पो जप्त केले आहेत. गेल्या वर्षभरात तब्बल ३ लाख रुपयांचा गुटखा एकट्या पुणे जिल्ह्यात पकडला गेला. त्यातही डिसेंबर महिन्यात येरवडा परिसरात सुमारे ६८ लाखांचा गुटखा पकडण्यात आला, असे एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. परंतु, येरवड्यात अजूनही सर्रास गुटख्याची विक्री केली जात असल्याचा आरोप स्थानिक आमदार जगदीश मुळीक यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.मुळीक म्हणाले, गुटखा बंदी असूनही येरवडा परिसरातील अनेक पान टपऱ्यांवर गुटख्याची बेकायदेशीरपणे विक्री केली जात आहे. एफडीएकडून वारंवार कारवाई केली जात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, गुटख्याचा अवैध व्यापार करणाऱ्या गुंडांच्या टोळ्या कार्यरत आहेत. त्यामुळे गुटख्याचा काळाबाजार करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई केली पाहिजे. परंतु, त्याबाबत अद्याप गांभीर्याने विचार केलेला दिसत नाही. गुटख्यासंबंधी मी विधान सभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी एफडीएने केवळ १२ ते १३ ठिकाणचा गुटखा जप्त केल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, याबाबत पुन्हा मी पाठपुरावा करून आढावा घेणार आहे.

टॅग्स :Yerwadaयेरवडाjagdish mulikजगदीश मुळीकPuneपुणे