पुण्यातील प्रसिद्ध अमृततुल्यवर एफडीएची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2019 10:15 AM2019-02-02T10:15:46+5:302019-02-02T12:29:16+5:30

गेल्या काही महिन्यात पुण्यात माेठ्या प्रमाणावर प्रसिद्धीस आलेल्या तसेच काॅर्पाेरेट लूट असणाऱ्या अमृततुल्यवर अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) कारवाई केली आहे.

FDA action on the famous tea shops of Pune | पुण्यातील प्रसिद्ध अमृततुल्यवर एफडीएची कारवाई

पुण्यातील प्रसिद्ध अमृततुल्यवर एफडीएची कारवाई

googlenewsNext

पुणे : गेल्या काही महिन्यात पुण्यात माेठ्या प्रमाणावर प्रसिद्धीस आलेल्या तसेच काॅर्पाेरेट लुट असणाऱ्या अमृततुल्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) कारवाई केली आहे. विना परवाना तसेच विना नाेंदणी चहा विक्री करणाऱ्यांच्या विराेधात एफडीएकडून धडक माेहिम हाती घेण्यात आली आहे. या कारवाईत बुधवार पेठेतील प्रसिद्ध येवले अमृततुल्य तसेच साईबा अमृततुल्यच्या विविध शाखांवर कारवाई करण्यात आली आहे. 

गेल्या काही महिन्यात पुण्यात चहाचेअमृततुल्य चर्चेचा विषय झाली आहेत. विविध थीम्स आणि नागरिकांना आकर्षिक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्य टॅगलाईनमुळे पुण्यात विविध ब्रॅंण्डचे अमृतुल्य सुरु झाले आहेत. दिवसभर या अमृततुल्यवर नागरिकांची माेठी गर्दी असते. हे ब्रॅण्ड इतके फेमस झाले की यांच्या अनेक शाखा शहरातील तसेच जिल्हातील विविध भागांमध्ये सुरु झाल्या. दरराेज लाखाेंचा व्यवसाय या माध्यमातून हाेत आहे. या अमृतुल्यमुळे पुणे आता चहाचे कॅपिटल झाले आहे. त्यातच आता विना नाेंदणी तसेच विना परवाना चहा विक्री करणाऱ्या अमृतुल्यवर एफडीने धडक कारवाई सुरु केली आहे. अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अंतर्गत जनहित व जनआराेग्य याच्या दृष्टीकाेनातून अत्यंत महत्त्वाच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुण्यातील प्रसिद्ध अमृतुल्यवर कारवाई करण्यात आली आहे. एफडीएचे सहआयुक्त सुरेश देशमुख यांच्या निर्देशानुसार सहायक आयुक्त संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी रमाकांत कुलकर्णी, इम्रान हवालदार व साेपान इंगळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

पुणे हाेतंय चहाचं कॅपिटल

यात प्रसिद्ध अशा बुधवार पेठेतील येवले अमृतुल्य तसेच साईबा अमृतुल्यच्या नानापेठ, धनकवडी, भारतीविद्यापीठ शाखांवर कारवाई करण्यात आली. या अमृतुल्यवर दंडात्मक कारवाई करुन विक्री तातडीने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. 

Web Title: FDA action on the famous tea shops of Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.