एल्गार परिषद : हार्डडिस्क मधील माहितीसाठी घेणार एफबीआयची मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 05:37 IST2019-12-27T05:36:50+5:302019-12-27T05:37:03+5:30
एल्गार परिषद प्रकरण : पुणे पोलिसांची न्यायालयात माहिती

एल्गार परिषद : हार्डडिस्क मधील माहितीसाठी घेणार एफबीआयची मदत
पुणे : एल्गार परिषद प्रकरणात जप्त केलेली एक हार्डडिस्क खराब झाली असून, त्यातील माहिती (डाटा) परत मिळविण्यासाठी पुणे पोलीस अमेरिकेच्या फेडरल ब्युरो आॅफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) ची मदत घेणार आहेत. यासंबंधीची माहिती पुणे पोलिसांनी न्यायालयाला दिली आहे़ पुणे पोलीस दलातील अधिकारी आणि फॉरेन्सिक तज्ज्ञ ही हार्डडिस्क घेऊन लवकरच अमेरिकेला जाणार आहेत़
एल्गार परिषदेतील संशयित आरोपी वरवरा राव यांच्या घरातून पुणे पोलिसांनी एक हार्डडिस्क जप्त केली होती़ ही हार्डडिस्क ओपन होत नसल्यामुळे पुणे पोलिसांनी यापूर्वी ४ वेगवेगळ्या फॉरेन्सिक लॅबची मदत घेतली होती़ परंतु, यातील माहिती मिळवण्यात अपयश आले़ त्यामुळे आता ही माहिती मिळवण्यासाठी अमेरिकेच्या एफबीआयची मदत घेण्याचे पोलिसांनी ठरविले आहे़
बंदी घातलेल्या माओवादी संघटनांशी संबंध असलेल्या अनेक संशयित आरोपींनी आपल्या संगणकावर काही पत्रे लिहिली व नंतर ती डिलिट केली होती़ त्यांना ती पत्रे डिलिट केल्यानंतर पुरावा नष्ट केला असा समज झाला होता़ पण, हार्डडिस्कवर सर्व कामाचा पुरावा उपलब्ध राहतो. त्यानुसार मिळालेल्या कथीत माहितीवरुन पोलिसांनी ांतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचला जात होता, असा निष्कर्ष काढला आहे़ तसा आरोप संशयित आरोपींवर करण्यात आला आहे़ मात्र, वरवरा राव यांच्याकडील हार्डडिस्कवरील माहिती मिळविण्यात अपयश आले आहे़