१२ वर्षांच्या मुलीवर पित्याचा वर्षभरापासून अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 18:11 IST2018-04-13T17:55:06+5:302018-04-13T18:11:26+5:30
१२ वर्षांची मुलगी घरात एकटी असताना कोयत्याचा धाक दाखवून तिच्या वडिलांनीच तिच्यावर अत्याचार केला.

१२ वर्षांच्या मुलीवर पित्याचा वर्षभरापासून अत्याचार
देहूरोड: देहूरोड येथील आंबेडकरनगरमध्ये एका ३६ वर्षीय नराधम पित्याने पोटच्या मुलीवरच लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे.
देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ वर्षांची मुलगी घरात एकटी असताना कोयत्याचा धाक दाखवून तिच्या वडिलांनीच तिच्यावर अत्याचार केला. गेल्या वर्षभरापासून तो मुलीशी अश्लील वर्तन करत होता. पीडित मुलीने फिर्याद दिली आहे. पीडित मुलीची आई मंगळवारी नातेवाईकांकडे गेली होती. त्यावेळी पीडित मुलीचा भाऊ बाहेर खेळायला गेला होता. त्यावेळी संबंधित अल्पवयीन मुलीला घराच्या हॉलमध्ये बोलवत कोयत्याचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केले. तसेच वाच्यता केल्यास तुला जीवे मारेन अशी धमकी दिली. याप्रकरणाचा अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहे.
--------------------