father killed daughter and hang himself ; incident in pune | मुलीचा खून करुन पित्याची आत्महत्या ; पुण्यातील धनकवडीतील घटना
मुलीचा खून करुन पित्याची आत्महत्या ; पुण्यातील धनकवडीतील घटना

धनकवडी : पत्नीच्या अनैतिक संबंधांमुळे मानसिक त्रासाला कंटाळून एका व्यक्तीने स्वतः च्या आठ वर्षाच्या मुलीचा गळा दाबून खून केला व स्वतः साडीच्या साहय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. अशिष जगन्नाथ भोंगळे वय ४३ वर्षे राहणार क्लासिक दर्शन अपार्टमेंट, बालाजीनगर  धनकवडी असे आत्महत्या केलेल्या व्यक्ती चे नाव आहे. तर श्रद्धा अशिष भोंगाळे वय वर्षे आठ या मुलीचा खून झाला आहे.  

शनिवारी सायंकाळी सात वाजता ही घटना घडली. सहकारनगर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार विनायक जांबळे यांनी फिर्याद दाखल केली. याप्रकरणी रविवारी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अशिष हे चालक म्हणून काम करीत होते. पत्नी शुभांगी आणि अशिष यांच्या मध्ये मतभेद होते. दोघांमधील वादामुळे पत्नी शुंभागी नांदत नव्हती. आशिष हे आपल्या दोन मुलांसमवेत त्याच्या आई बरोबर धनकवडी मध्ये राहत होता. 

शनिवारी सायंकाळी अशिष यांची आई कामानिमित्त बाहेर गेली असता. अशिष यांनी मुलगी श्रद्धा हिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याने स्वतः घरातील पंख्याला साडी बांधून गळफास घेतला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अशिष यांच्या पत्नी शुंभागी आणि राजेश भिलारे यांच्यात  प्रेम संबंध असल्याचा अशिष यांना संशय होता. त्यामुळे त्यांनीआत्महत्या केली असावी.


Web Title: father killed daughter and hang himself ; incident in pune
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.