बापरे बाप अज्ञात ताप.!
By Admin | Updated: October 18, 2014 23:03 IST2014-10-18T23:03:50+5:302014-10-18T23:03:50+5:30
डेंग्यू, स्वाइन फ्लू या आजारांनी पुण्यात थैमान माजविलेले असतानाच आता अज्ञात स्वरूपाच्या तापानेही पुणोकरांना हैराण केले आहे.

बापरे बाप अज्ञात ताप.!
राहुल कलाल ल्ल पुणो
डेंग्यू, स्वाइन फ्लू या आजारांनी पुण्यात थैमान माजविलेले असतानाच आता अज्ञात स्वरूपाच्या तापानेही पुणोकरांना हैराण केले आहे. गेल्या नऊ महिन्यांत शहरात अज्ञात तापाचे तब्बल 7 हजार 9क्3 रुग्ण सापडले आहेत. यावरून पुण्यात अज्ञात तापाचा उद्रेक झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
शहरात 5 वर्षापासून स्वाइन फ्लू आणि शहरात डेंग्यूने अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. आता यात भर म्हणून गेल्या नऊ महिन्यांपासून शहरात तापाने फणफणलेल्या रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढली आहे. व्हायरल इन्फेक्शनमुळे, डेंग्यूमुळे, क्षयरोग आदींमुळे ताप येतो. रक्ताच्या तपासणीमध्ये तापाचे मूळ कारण काय हे समजून येते. मात्र अनेक पुणोकरांना आलेला ताप कशामुळे आला, हे प्रयोगशाळेच्या तपासातूनही समजून आलेले नाही.
अज्ञात तापाचे शहरात हजारो रुग्ण सापडल्याची आकडेवारी पुणो पालिकेच्या आरोग्य विभागाने प्रसिद्ध केली आहे. यामध्ये फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक 1 हजार 513 रुग्ण सापडल्याचे सांगण्यात आले आहे. त्या पाठोपाठ मे महिन्यात 1 हजार 316 रुग्ण सापडले आहेत. सप्टेंबर महिन्यात सर्वात कमी 46क् रुग्ण सापडले आहेत. मात्र यापैकी किती पूर्णपणो बरे झाले आणि किती जणांना आपला जीव गमवावा लागला याची आकडेवारी पालिकेने दिलेली नाही.(प्रतिनिधी)
काय आहे अज्ञात ताप..
तीन आठवडे किंवा त्यापेक्षा अधिक दिवस सतत ताप येत असल्यास तो ताप जीवघेणा ठरू शकतो. यामुळे संबंधित व्यक्तीच्या रक्ताच्या व इतर तपासण्या कराव्या लागतात. मात्र या तपासण्या करूनही अहवालात कोणत्याही आजाराचे निदान होत नाही. तेव्हा त्या आजाराला अज्ञात ताप (फिव्हर ऑफ अन्नोन ओरिजीन) म्हटले जाते.
उपचार आहेत
अज्ञात तापावर संबंधित रुग्णांना रुग्णालयात दाखल करून उपचार करावे लागतात. मात्र पुणो पालिकेच्या दवाखान्यांमध्ये यासाठी आवश्यक अत्याधुनिक सोयी नाहीत. त्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयात जाण्यापासून पर्याय नसतो. अशा रुग्णाचे कॉन्झव्र्हेटिव्ह कल्चर करून कोणत्या अॅन्टीबायोटिक्सने ताप कमी होईल, याची तपासणी करून ती औषधे रुग्णाला दिली जातात.
अज्ञात तापाचे
या वर्षातील रुग्ण
महिनारुग्ण संख्या
जानेवारी956
फेब्रुवारी1513
मार्च1क्89
एप्रिल789
मे1316
जून586
जुलै681
ऑगस्ट 513
सप्टेंबर46क्