शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: बाप लेकानेच केला बाप लेकाचा खून; पुण्यातील दुहेरी हत्याकांडात तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 20:09 IST

पूर्ववैमनस्यातून बाप-लेकावर धारदार हत्याराने वार करून खून केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात लोणी कंद पोलिसांना यश आले आहे

पुणे : पूर्ववैमनस्यातून बाप-लेकावर धारदार हत्याराने वार करून खून केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात लोणी कंदपोलिसांना यश आले आहे. प्रतीक अनिल कंद (वय २८), आशुतोष नानासाहेब शिंदे आणि नानासाहेब शिंदे (सर्व रा. लोणी कंद) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. प्रथमेश ऊर्फ सनी कुमार शिंदे (वय २२) आणि कुमार मारुती शिंदे (वय ५५, दोघेही रा. शिंदेवस्ती, लोणी कंद) अशी खून झालेल्या बापलेकांची नावे आहेत. तर निखिल पाटील, ऋग्वेद वाळके, ऋतिक किनकर, निखिल नितीन जगताप, माऊली कोलते, अभी गव्हाणे, शुभम वाबळे यांच्यासह आणखी चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास लोणी कंदमध्ये घडली होती.

मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात सचिन शिंदे तरुणाचा खून झाला होता. यातील आरोपी प्रथमेश ऊर्फ सनी शिंदे याच्यावर गुन्हा दाखल होता. संबंधित गुन्ह्यात तो तीन महिन्यांपूर्वी जामिनावर बाहेर आला होता. बुधवारी रात्री सातच्या सुमारास प्रथमेश ऊर्फ सनी आणि त्याचे वडील मोटारमधून लोणी कंदमधून शिंदे वस्तीकडे निघाले होते. त्यावेळी दुसऱ्या मोटारीतून आलेल्या प्रतीक कंद, आशुतोष शिंदे आणि नानासाहेब शिंदे या बापलेकाने साथीदारांच्या मदतीने सनीवर धारदार शस्त्रांनी वार केला. या वेळी त्याला वाचविण्यासाठी वडील कुमार शिंदे मध्ये आले. त्या वेळी टोळक्याने त्यांच्यावरही वार केले. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर टोळके पसार झाले होते. लोणी कंद पोलिसांनी तपास करून तिघांना अटक केली. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, पोलीस निरीक्षक राजेश तटकरे, सहायक पोलीस निरीक्षक निखिल पवार, पोलीस उपनिरीक्षक सूरज गोरे यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Loni Kandलोणी कंदPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकCourtन्यायालय