शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

Pune Accident: पुण्यातील यवतजवळ एसटीचा भीषण अपघात; बसचा चेंदामेंदा, ३० जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2024 15:09 IST

पुणे सोलापूर मार्गावरून जात असताना एसटी झाडावर आदळून घडला अपघात, ३० प्रवासी जखमी

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात यवतजवळ असलेल्या सहजपुर गावाच्या हद्दीत एसटी बसचा अपघात झाला‌य. भरधाव वेगात असणारी एसटी झाडावर आदळून हा अपघात घडल्याचे समोर आले आहे. या घटनेत बसमधील ३०  जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळपासच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी भरती करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 

मिळालेल्या माहितीनुसार एसटी बस पंढरपूर वरून मुंबईकडे चालली होती. पुणे सोलापूर रस्त्यावरून बस वेगाने जात असताना झाडावर आदळली. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहीजण गंभीर असल्याची शक्यता वर्तवण्यात आलीये.

अपघात इतका भीषण होता कि, अक्षरशः बसचा चेंदामेंदा झाल्याचे दिसून येत आहे. अपघातानंतर स्थानिक रहिवासी, समाजसेवक, पोलीस यांनी घातास्थळी धाव घेतली आहे. तसेच मदतकार्य सुरु झाले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. रस्त्यावरीलही वाहतूक कोंडीचे नियोजन पोलिसांकडून सुरु आहे. पुण्यात अपघातांचे सत्र सुरूच आहे. वारंवार होणाऱ्या जीवघेण्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता बसचालक, एसटी चालक यांच्यावरही विश्वास ठेवायचा का नाही? असा सवाल उपस्थित होऊ लागलाय.   

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातhighwayमहामार्गPandharpurपंढरपूरPoliceपोलिसGovernmentसरकारhospitalहॉस्पिटल