शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

Accident: पुणे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2023 17:45 IST

अपघात इतका भीषण होता कि पाचही तरुण हवेत उडाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले

भिगवण: पुणे सोलापूर महामार्गावर स्वामी चिंचवली (ता.दौंड )  गावच्या हद्दीत स्विफ्ट कारचा अपघात होवून २ तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर ३ तरुण जखमी झाल्याची घटना दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. सुसाट वेगामुळे गाडीवरील ताबा सुटल्यामुळे गाडीने हवेत उडी मारीत १०० फुट पलट्या झाल्याने पाचही तरुण हवेत उडाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

वैभव विठ्ठल जांभळे (वय.२४ रा.तक्रारवाडी), प्रतिक पप्पू गवळी (वय २२ रा.मोशी ता.हवेली) अशी अपघातात जीव गमाविलेल्या तरुणांची नावे आहेत. तर सुरज राजू शेळके (वय २३) आशीफ बशीर खान (वय २२ दोघे रा. भिगवण) ऋषिकेश बाळासाहेब येळे (वय.२२ रा.इंदापूर) अशी जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत. हे तरुण आपसातील मित्र असून हे ५ जन सुरज शेळकेच्या स्विफ्टमधून पुणे येथे निघाले होते. मात्र भिगवणहून पुणे कडे जाताना गाडी सुसाट वेगाने जात असताना स्वामीचिंचोली गावच्या हद्दीत दुचाकी वाचविण्याच्या नादात गाडी वरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. गाडीवरील ताबा सुटल्यामुळे तसेच महामार्गाला कोणताही संरक्षण कठडा नसल्यामुळे गाडी उडी घेत सर्विस रोडवर तर परत वरती जावून मुख्य मार्गाच्या चारीत पलटी झाली. गाडीचा वेग अगदीच सुसाट असल्यामुळे पाचही तरुण गाडीतून हवेत फेकले गेले. यातील वैभव आणि  प्रतिक याच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर सुरज,आशीफ आणि ऋषिकेश जखमी झाले.

यावेळी आसपास असणाऱ्या नागरिकांनी अपघातातील तरुणांना तातडीने भिगवण येथील हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यासाठी मदत केली. हे तरुण सुसाट वेगाचे बळी ठरले असले तरी याला महामार्गावर मुख्य मार्गाला संरक्षण कठडा असता तर जीव वाचू शकले असते अशी चर्चा अपघात स्थळी होताना दिसून आली. तर पुणे सोलापूर महामार्गावर सुसाट वेगामुळे जीव जात असताना हायवे प्रशासन अपघात प्रणव क्षेत्रावर कोणत्याही प्रकारच्या सुधारणा करत नसल्याचे दिसून येत आहे.

अपघातातील मृत तरुणांची भिगवण पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली असून पुढील तपासासाठी दौंड पोलीस ठाण्यात पाठविले जाणार असल्याची माहिती प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांनी दिली.

टॅग्स :Puneपुणेhighwayमहामार्गAccidentअपघातDeathमृत्यूhospitalहॉस्पिटल