Pune News| भिगवण-राशीन रोडवर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 08:04 PM2022-11-16T20:04:24+5:302022-11-16T20:05:01+5:30

मदनवाडी गावच्या हद्दीत तुळजाभवानी हॉटेल समोर अपघात

Fatal accident on Bhigwan-Rasheen Road; Bike rider dies during treatment pune latest news | Pune News| भिगवण-राशीन रोडवर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू

Pune News| भिगवण-राशीन रोडवर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू

googlenewsNext

भिगवण (पुणे) :भिगवण-राशीन राज्यमार्गावर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनाने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीवरील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला. मदनवाडी गावच्या हद्दीत तुळजाभवानी हॉटेल समोर हा अपघात घडला असून नागरिकांनी ड्रायव्हरला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात मोहम्मद आबिद अन्सारी (वय .२४ सध्या रा. रॉयल इन हॉटेल मदनवाडी मूळ. डाबा केंद ता. नारायणपूर जि. जामताडा झारखंड) याचा मृत्यू झाला आहे. अन्सारी त्याच्या दुचाकी (एम. एच. ४२ पी ७०००) वरून जात असताना मदनवाडी चौक शेजारी ऊस वाहतूक करणाऱ्या मोकळ्या वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे अपघात घडला. यात अन्सारी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर सोहेब अख्तर अन्सारी गंभीर जखमी झाला.

जखमीला भिगवण येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.याबाबत अमोल संजीव नंदे (वय. २८ रा. मांजरगाव ता. करमाळा) याच्या विरोधात दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अपघात ग्रस्त ट्रॅक्टरला नंबर नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

Web Title: Fatal accident on Bhigwan-Rasheen Road; Bike rider dies during treatment pune latest news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.