बियांची राखी बांधून निसर्ग संवर्धनाचा वसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:14 IST2021-08-23T04:14:08+5:302021-08-23T04:14:08+5:30
गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. जिज्ञा ठक्कर व तेजश्री पद्मनाभी यांनी हा उपक्रम सुरू केला. ...

बियांची राखी बांधून निसर्ग संवर्धनाचा वसा
गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. जिज्ञा ठक्कर व तेजश्री पद्मनाभी यांनी हा उपक्रम सुरू केला. खरंतर जिज्ञा यांची आई अनुसया ठक्कर यांची ही कल्पना आहे. या राख्यांमध्ये कागद, कापड, दोरा व त्यात विविध फुलझाडे, फळभाज्यांच्या बिया आहेत. रक्षाबंधनानंतर राख्यांमधील बिया कापड किंवा कागदापासून विलग करून मातीत पुरायच्या आहेत. त्यास खत-पाणी दिले की त्याची रोपे तयार होतील. भाऊ-बहिणीच्या या पवित्र नात्याची एक छानशी आठवण म्हणजे हे रोप असणार आहे. म्हणून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या राख्यांमधून जो निधी जमा झाला तो पूरग्रस्तांना देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्याशी देखील एक गोड माणुसकीचे नाते तयार केले आहे. तसेच ग्रामीण भागातील महिलांना सॅनिटरी पॅडचे मोफत वाटप या निधीमधून करण्यात आले.
-----------------
मी एका प्रदर्शनात बियांची राखी पाहिली होती. त्यानंतर मी त्याची ऑर्डर अनुसया ठक्कर यांना दिली. पण तेव्हा त्या खूप आजारी होत्या. तरी देखील त्यांनी त्यांची मुलगी जिज्ञा हिला ती ऑर्डर घ्यायला सांगितली. त्यानंतर मला राख्या मिळाल्या. पण ज्यांची ही कल्पना होती, त्या मात्र या जगाचा निरोप घेऊन गेल्या. त्यामुळे त्यांची एक सुंदर कल्पना आज प्रत्यक्षात आली, याचे समाधान आहे. त्यांची आठवण म्हणून या राख्या सदैव मनात घर करून राहतील.
- अनुष्का कजबजे
----------------------------