शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

पुणे जिल्ह्यात शेतकरी स्वतःच जाळतायत शेतातील ऊस? नेमकं कारण काय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 14:09 IST

उजनीकाठावर ऊस जाळून तोडण्याचा सपाटा, शेतकऱ्यांचे नुकसान...

पळसदेव (पुणे) : पळसदेव भागासह इंदापूर तालुक्यात अनेक भागांत ऊस तोडून नेण्यासाठी प्रतिएकरनुसार ऊसतोडणी कामगारांना पैसे देण्याची वेळ ऊस उत्पादक शेतकऱ्यावर आली आहे. तर ऊस वाहतूक करणाऱ्या ड्रायव्हरला दररोज २०० रुपये भत्ता असा दररोज हजारो रुपये खर्च करण्याची वेळ सध्या शेतकऱ्यांवर आली आहे. एवढे करूनही ऊसतोडणी कामगारांनी सध्या ऊस पेटवून तोडण्याचा सपाटा लावला असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पोटच्या पोरागत दीड वर्ष सांभाळलेल्या उसाला डोळ्यादेखत जळताना पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

सध्या मोठ्या प्रमाणात ऊस जाळून तोडला जात असल्याचे चित्र आहे, त्यामुळे जळिताचा ऊस गाळपाला गेल्यावर शेतकऱ्याचे प्रतिटनानुसार नुकसान होत आहे. सध्या रोगग्रस्त नसलेलादेखील ऊस पेटवून तोडण्याचा सपाटा उजनी काठावर सुरू आहे. याबाबत कारखाना प्रशासनाने लक्ष देण्याची आवशकता निर्माण झाली आहे. उजनी पट्ट्यात उसाचे क्षेत्र जास्त आहे. सध्या नुकताच उन्हाळा सुरू झाला आहे, त्यामुळे शेतातील ऊस लवकर गाळपासाठी जावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे ऊस घालवण्यासाठी शेतकरी धडपड करत आहे. काही ठिकाणी उसाला तुरे येऊन स्थिर झाले आहेत. उसाचे वजन घटत आहे. मात्र, शेतकऱ्याच्या अडचणींचा गैरफायदा घेण्याचे काम ऊसतोडणी कामगार व ऊस वाहतूक करणारे मालक घेत आहेत.

अनेक शेतकरी चांगल्या प्रतीचा ऊस खाजगी कारखान्याला गाळपाला देत आहेत व रोगग्रस्त ऊस कर्मयोगी कारखान्याने न्यावा अशी अपेक्षा करत आहेत. सहकार टिकवणे सर्वांची जबाबदारी आहे. रोगग्रस्त ऊस तोडणे कामगारांना त्रासदायक आहे, त्यामुळे ऊस पेटवून तोडला जात आहे. शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचादेखील ऊस कर्मयोगी कारखान्याला गाळपासाठी द्यावा व इतर रोगग्रस्त ऊसदेखील कारखाना गाळपासाठी नेणार आहे. एकाही सभासदाचा ऊस राहणार नाही याची काळजी घेतली जात आहे.

- भूषण काळे (संचालक, कर्मयोगी सहकारी कारखाना)

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेDamधरण