अर्जाच्या रांगेत शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 02:29 IST2017-08-12T02:29:24+5:302017-08-12T02:29:24+5:30
नोटाबंदीनंतर पैैसे काढण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या एका शेतकºयाच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच शुक्रवारी पीककर्जासाठी आॅनलाईन फॉर्म भरण्याच्या रांगेत उभ्या असलेल्या शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

अर्जाच्या रांगेत शेतकऱ्याचा मृत्यू
डेहणे : नोटाबंदीनंतर पैैसे काढण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या एका शेतकºयाच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच शुक्रवारी पीककर्जासाठी आॅनलाईन फॉर्म भरण्याच्या रांगेत उभ्या असलेल्या शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना खेड तालुक्यातील वाडा येथील केंद्रावर घडली.
शंकर मारुती ठोकळ (वय ६२, रा. नायफड) असे मृत शेतकºयाचे नाव आहे. शंकर ठोकळ हे अल्पभूधारक शेतकरी होते. डेहणे येथील आदिवासी विकास सोसायटीमधून त्यांनी जुलै २०१५मध्ये ६२ हजार रुपये पीककर्ज घेतले होते. डोंगराळ भागात राहणारा शेतकरी भातशेतीवर अवलंबून असतो. पिकाने दगा दिल्याने जून २०१७मध्ये ठोकळ घेतलेले कर्ज भरू शकले नव्हते. त्यामुळे ते थकीत कर्जदार झाले होते. या वर्षी कर्जमाफी योजनेत ते पात्र थकीत कर्जदार झाले होते. त्यांना ७५,३२७ रुपये कर्जमाफी मिळणार होती. त्यासाठी आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी शुक्रवारी सकाळी लवकर उठून ते २० किलोमीटर दूर असलेल्या वाडा येथे महा ई-सेवा केंद्रात आले होते. डेहणे, वाडा परिसरातील नेटवर्कमध्ये अडथळा असल्याने सकाळपासून ते रांंगेत उभे होते. फक्त चहा प्यायलेले ठोकळ यांना दगदग सहन झाली नाही. मोठी गर्दी असल्याने त्यांना रांगेत बराच काळ ताटकळत उभे राहावे लागले होते. यामुळे भोवळ आल्याने ते खाली कोसळले.
कर्जमाफी जाहीर केली; परंतु अनेक अटी घातल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. ‘भीक नको, पण कुत्रं आवर’ असे म्हणण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.