शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची पोरं आत्महत्या करतायेत अन् राज्यमंत्री पार्ट्यांवर ताव मारतायेत; हर्षवर्धन पाटलांची भरणेंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 17:22 IST

पुणे सोलापूर महामार्गावर हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले

इंदापूर : पुणे सोलापूर महामार्गावर हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात हजारोच्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले होते. विज वितरण विभागाने तात्काळ विज जोडणी करावी अन्यथा रस्त्यावरून बाजुला न हटण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता. यावेळी भाषणात हर्षवर्धन पाटील यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर टीका केली आहे. राज्यात शेतकर्‍यांची पोर आत्महत्या करत असताना राज्यमंत्री घोड्यावर, रथातुन मिरवणुक काढुन पार्ट्यांवर ताव मारत असल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत.

माजी मंत्री तथा भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली इंदापूर बाह्यवळण, मालोजीराजे भोसले चौक येथील सोलापूर- पूणे हायवे महामार्गावर विद्युत वितरण विभागाच्या विज तोडणी मनमानी कारभाराविरोधात भाजपच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यावेळी आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन करताना पाटील बोलत होते.

पाटील म्हणाले, शासनाने आजच आदेश द्यावा व लाईट तात्काळ चालु करावी, मार्च - एप्रिल - मे असे तीन महिने लाईट न घालवता थकीत बीलाचे चार हप्ते करून ते ठरलेल्या नियमाप्रमाणे स्विकारावेत, वीज तात्काळ जोडावी व १० तास वीज द्यावी, तालुक्यात ट्रान्सफर मागणी पेंडीग आहे ते ट्रान्सफर तात्काळ मंजुर करून कार्यान्वित व्हावेत अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत. तर राज्यात शेतकर्‍यांची पोर आत्महत्या करत असताना राज्यमंत्री घोड्यावर, रथातुन मिरवणुक काढून पार्ट्यांवर ताव मारत फिरत असल्याची टीका पाटलांनी केली आहे.

आंदोलकांनी पूणे- सोलापूर हायवे रस्ता रोखून तब्बल साडेतीन तास रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या दुतर्फा पंधरा ते वीस किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याने वाहन चालक व प्रवाशांचे मोठे हाल झाल्याचे चित्र पहायला मिळाले.  यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणविस यांच्याशी हर्षवर्धन पाटील यांनी चर्चा केली. व फडणविस यांनी आंदोलकांना मार्गदर्शक सुचना दिल्यानंतर दुपारी २:३० वाजता आंदोलन स्थगित केल्याचे जाहिर केले.

टॅग्स :Indapurइंदापूरharshvardhan patilहर्षवर्धन पाटीलBJPभाजपाfarmer suicideशेतकरी आत्महत्या